हिलरीच सर्वांत योग्य उमेदवार
By Admin | Updated: July 29, 2016 01:41 IST2016-07-29T01:41:56+5:302016-07-29T01:41:56+5:30
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिकच्या हिलरी क्लिंटन याच योग्य उमेदवार असल्याचे सांगत रिपब्लिकनच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन अध्यक्ष बराक

हिलरीच सर्वांत योग्य उमेदवार
फिलाडेल्फिया : अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिकच्या हिलरी क्लिंटन याच योग्य उमेदवार असल्याचे सांगत रिपब्लिकनच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. भडकाऊ भाषणे करून भय पसरविणाऱ्या ट्रम्प यांच्याविरुद्ध आम्ही एक असल्याचे सांगत ओबामा म्हणाले की, २००८ मध्ये प्रतिस्पर्धी राहिलेल्या हिलरी यांना जबाबदारी सोपविण्यासाठी आपण तयार आहोत.
डेमोक्रॅटिकच्या पक्ष प्रतिनिधींना संबोधित करताना आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले की, अध्यक्षपदासाठी एवढा योग्य उमेदवार यापूर्वी मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)