हिलरी क्लिंटन सैतान आहे - डोनाल्ड ट्रम्प

By Admin | Updated: August 2, 2016 13:14 IST2016-08-02T13:14:26+5:302016-08-02T13:14:26+5:30

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे.

Hillary Clinton is Satan - Donald Trump | हिलरी क्लिंटन सैतान आहे - डोनाल्ड ट्रम्प

हिलरी क्लिंटन सैतान आहे - डोनाल्ड ट्रम्प

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २ - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. अमेरिकेतील एका वर्तमानपत्राने रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे न्यूड फोटो प्रसिद्ध केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना सैतान म्हटले आहे. 
 
प्रचारसभेत समर्थकांसमोर भाषण करताना ट्रम्प यांनी हिलरी यांचा सैतान म्हणून उल्लेख केला. व्हरमॉंटचे सिनेटर बर्नी सँडर्स यांनी क्लिंटन यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेऊन सैतानाबरोबर हातमिळवणी केली आहे अशी विखारी टीका ट्रम्प यांनी केली. आपण चुकीचा व्यवहार केला हे सँण्डर्स आणि त्यांच्या समर्थकांना माहित आहे. 
 
आणखी वाचा 
 
सँडर्सने आपला आत्मा सैतानाला विकला आहे असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या विधानानंतर प्रचाराची पातळी आणखी खाली घसरणार आहे. ट्रम्प तसे वादग्रस्त विधाने करण्यासाठीच ओळखले जातात. 

Web Title: Hillary Clinton is Satan - Donald Trump