हिलरी क्लिंटनसाठी 'ती' झाली न्यूड

By Admin | Updated: September 28, 2016 22:16 IST2016-09-28T19:37:24+5:302016-09-28T22:16:38+5:30

प्रसिद्ध पॉपस्टार केट पेरीने डेमॉक्रॅटीक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. पण तिने ही घोषणा चक्क नग्न होऊन केली आहे.

Hillary Clinton became 'she' for Nude | हिलरी क्लिंटनसाठी 'ती' झाली न्यूड

हिलरी क्लिंटनसाठी 'ती' झाली न्यूड

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि. 28 - अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. येथील दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार आपला प्रचार करताना दिसत आहेत. दोन्ही नेते एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत. यामध्येच तेथील कलाकार दोन्ही बाजूने विभागले गेले असल्याचे चित्र समोर आले आहे. 
 
31 वर्षीय प्रसिद्ध पॉपस्टार केटी पेरीने डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. पण तिने ही घोषणा चक्क नग्न होऊन केली आहे. तिने ही घोषणा सोशल मीडियावर केल्यानं त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. केटीने ट्विटरवर तिने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती पूर्णपणे नग्नावस्थेत दिसत आहे. या फोटोसोबत तिने हिलरी क्लिंटनला मत करा असं कॅप्शन दिले आहे. 
 
 
35 वर्षीय रिअॅलिटी टीव्ही पर्सनॅलिटी किम कार्दशिअन हिने डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी अनुमान लावला जात होता की, किम डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने मतदान करेल.

Web Title: Hillary Clinton became 'she' for Nude