शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनची नवी चाल! अरुणाचल सीमेजवळ चीनने बांधला महामार्ग; भारताच्या सुरक्षेला मोठं आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:49 IST

दोन किलोमीटरचा बोगदाही, हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे.

बीजिंग : गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्य मागे घेतल्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ हालचालींना वेग दिला आहे. चीनने तिबेटच्या ईशान्येकडील दूर भागात महामार्ग बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असून, भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतो. या महामार्गावर दोन किलोमीटर लांब बोगदाही समाविष्ट आहे.

हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कलमध्ये मोडते. ते मॅकमोहन सीमेला स्पर्श करते. मॅकमोहन लाईन चीन आणि भारत यांच्यात प्रत्यक्ष सीमा चिन्हितकरते. चीन अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग समजत नाही आणि तो दक्षिण तिबेटमध्ये मोडतो, असा दावा करतो.हा महामार्ग भारतासोबत प्रत्यक्ष नियंंत्रण रेषेजवळ (एलएसी) रस्ते आणि बोगद्यांच्या निर्मितीच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा भाग आहे.  यामुळे चीनमधील दूर अंतरावरील भागही शहरे आणि विमानतळांशी जोडले जातील.

महामार्गामुळे काय परिणाम होणार?

महामार्ग सुरू झाल्यामुळे आता तिबेटचे शहरी भाग निंगची आणि सीमेला खेटून असलेले गाव यांच्यातील प्रवास फक्त आठ तासांचा असेल. असे समजले जाते की, चीनचा मोठ्या यारलुंग जांग्बो हायड्रो-पाॅवर प्रोजेक्टची योजना बनवण्यातही हा महामार्ग मोठी भूमिका पार पाडेल. तिबेटची यारलुंग जांग्बो नदी ही भारतात वाहून आल्यावर अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदी बनते. येथून ही नदी बांगलादेशात जाते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश