शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'बदला घेतला'; हिजबुल्लाहचा इस्रायलवर पलटवार! डागली ३२० रॉकेट्स, ११ लष्करी तळांवर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 11:46 IST

Hezbollah missile attack on Israel: इस्रायलने विमानतळे केली बंद, नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाची बोलावली बैठक

Hezbollah missile attack on Israel: लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा ड्रोन आणि रॉकेट हल्ला केला. गेले दोन दिवस इस्रायलने हिजबुल्लाला लक्ष्य करत लेबनॉनमधील अनेक भागांवर हल्ले केले होते. इस्रायलवरील हल्ल्यानंतर लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाने म्हटले आहे की त्यांनी बेरूतमध्ये मारल्या गेलेल्या कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेतला आहे. या हल्ल्यात इस्रायलच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. हल्ले कुठे झाले ते नंतर जाहीर केले जाईल. इस्त्रायली लष्कराच्या बॅरेक्स आणि आयर्न डोमला लक्ष्य करत असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.

हिजबुल्लाहने इस्रायलवर ३२० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. अल जजीराच्या वृत्तानुसार, इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहने रविवारी ११ इस्रायली लष्करी तळांवर ३२० कात्युशा रॉकेट डागल्याचे सांगितले. हिजबुल्लाने आपला टॉप कमांडर फुआद शुकर याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. ३० जुलै रोजी इस्रायलच्या बेरूतमधील हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर मारला गेला होता.

दुसरीकडे, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी आणीबाणी जाहीर केली. राजधानी तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ बंद करून सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग फ्लाइट्स ९० मिनिटांसाठी थांबवण्यात आल्या. मात्र, नंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जिथे दुसरीकडे इजिप्तमध्ये गाझात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी बैठक सुरू आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराणwarयुद्ध