शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 19:05 IST

"हिजबुल्लाहने शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नसरल्लाह आपले सहकारी शहीदांमध्ये सामील झाले आहे..."

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, आपले सहकारी नसरल्लाह शहीदांमध्ये सामील झाल्याचे म्हटले आहे.  

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नसरल्लाह आपले सहकारी शहीदांमध्ये सामील झाले आहे. एवढेच नाही तर, हिजबुल्लाह शत्रू विरोधात आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पवित्र युद्ध सुरू ठेवण्याची शपथ घेत आहे, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

तीन दशकांपेक्षाही अधिक काळ केलं नेतृत्व - नसरल्लाहने तीन दशकांपेक्षाही अधिक काल दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे नेतृत्व केले. त्याच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील संघर्ष नाट्यमय रित्या बदलू शकतो, असे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, शुक्रवारी इस्रायलने हिजबुल्लाहवर मोठा हल्ला करत बेरूतमधील त्यांच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याचा दावा इस्रायली लष्कराने शनिवारी केला होता. यानंतर आता खुद्द हिजबुल्लाहनेही याची पुष्टी केली आहे. 

कोण होता नसरल्लाह? सय्यद हसन नसरल्लाहचा जन्म ३१ ऑगस्ट १९६० रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उत्तरेकडील बुर्ज हमौद येथे झाला होता. हसन नसरल्लाहचे त्याच्या वडिलांनी अत्यंत गरिबीत पालनपोषण केले. त्यांचे एक छोटे दोकान होते. 1992 मध्ये हसन नसरल्लाह हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला. इराणच्या पाठिंब्याने हसन नसरल्लाहने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली. दरम्यान, हिजबुल्लाहचे इस्रायलशी असलेले शत्रुत्व नवीन नाही, उलट हिजबुल्लाहची स्थापनाच इस्रायलविरोधात होती.

हसन नसरल्लाह नेहमी आपले ठिकाण बदलत होता. कारण शत्रू केव्हीही आपल्यावर हल्ला करू शकत याची त्याला भीती होती. मात्र, यावेळी हसन नसरल्लाह इस्रायली सैन्याच्या नजरेतून स्वत:ला वाचवू शकला नाही. दरम्यान, हसन नसरल्लाहची चार मुलंही हिजबुल्लाहशी संबंधित होती. त्याचा मोठा मुलगा हिजबुल्लाह सेनानी होता आणि तो 1997 मध्ये इस्रायली हल्ल्यात मारला गेला.

हसन नसरल्लाह हा 1975 मध्ये लेबनॉनमधील गृहयुद्धात सक्रिय होता. तो इस्रायलच्या लेबनीज भूभागाच्या विरोधात होता. तेव्हापासून त्याचे इस्रायलशी जास्त वैर निर्माण झाले होते. हसन नसरल्लाह पूर्वी शिया मिलिशिया संघटनेचा सदस्य होता. नंतर हिजबुल्लाहमध्ये सामील झाला. 1992 मध्ये हिजबुल्ला प्रमुख सय्यद अब्बास मुसावीची हत्या झाली. त्यानंतर हसन नसरल्लाह हा हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला होता. 

 

टॅग्स :Israelइस्रायलTerrorismदहशतवादterroristदहशतवादी