'इथे' तयार होतेय जगातील पहिले सेक्स थीम पार्क
By Admin | Updated: May 5, 2016 14:49 IST2016-05-05T14:49:23+5:302016-05-05T14:49:23+5:30
ब्राझीलच्या इरॉटिक लँड येथे जगातील पहिले सेक्स थीम पार्क आकाराला येत आहे. २०१८ मध्ये हे सेक्स पार्क सुरु होणार आहे.

'इथे' तयार होतेय जगातील पहिले सेक्स थीम पार्क
ऑनलाइन लोकमत
साओ पावलो, दि. ५ - ब्राझीलच्या इरॉटिक लँड येथे जगातील पहिले सेक्स थीम पार्क आकाराला येत आहे. २०१८ मध्ये हे सेक्स पार्क सुरु होणार आहे. या थीम पार्कला भेट देणा-यांच्या लैंगिक भावना जागृत होतील अशी पूर्ण व्यवस्था या पार्कमध्ये असेल.
पण त्यांना इथे प्रत्यक्ष सेक्सचा अनुभव घेता येणार नाही. जास्त भावना अनावर झाल्या तर ते, जवळच्या शरीरविक्री करणा-या केंद्रावर जाऊ शकतात असे या थीम पार्कमध्ये गुंतवणूक करणा-यांनी सांगितले.
या थीम पार्कमध्ये लैंगिकतेच्या इतिहासाची माहिती देणारे एक म्युझियम असेल. इथले कर्मचारी पर्यटकांना कंडोम वापरण्यासाठी प्रेरीत करतील.
काय असणार आहे या सेक्स थीमपार्कमध्ये
'७डी' सिनेमागृह ज्याच्या सीटस वायब्रेट होतील
ट्रेन ऑफ प्लेजर
लिंगाच्या आकाराच्या कार
सेक्स प्लेग्राऊंड़
लैंगिक पॉवर वाढवणा-या खाद्यपदार्थांचा बार
सेक्सबद्दल एक चांगला दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न असून इथे होणा-या गुंतवणूकीमुळे २५० स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. साओ पावलो पासून दोन तासांच्या अंतरावर हे पार्क असेल.