शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका घेईल भारताचे साह्य, निक्की हॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 2:03 AM

दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळणा-या समर्थनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर धोरण अवलंबले असतानाच, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आम्हाला मदत करू शकतो

वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळणा-या समर्थनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर धोरण अवलंबले असतानाच, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आम्हाला मदत करू शकतो, असे अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली यांनी म्हटले आहे.अमेरिकेच्या राजदूताने केलेल्या या विधानामुळे पाकिस्तान अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अमेरिकेने दहशतवाद्यांच्या आश्रय व मदत देऊ नका, यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला होता, पण आता प्रथमच त्यासाठी भारताची मदत घेण्याचे सूतोवाच भारतातर्फे करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधील भारताच्या भूमिकेला सातत्याने विरोध करणाºया पाकिस्तानला याचा धक्का बसू शकेल.संयुक्त राष्ट्रसंघात बोलताना निक्की हॅली म्हणाल्या की, अफगाणिस्तान व दक्षिण आशियातील दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने नवी रणनीती आखली आहे. त्या रणनीतीमध्ये भारत व अमेरिका यांचा सहभाग असू शकेल. अफगाणिस्तान व दक्षिण आशियात असलेल्या दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना संपविणे महत्त्वाचे आहे.ते दहशतवादी अमेरिकेसाठीही त्रासदायक असून, त्यांच्या हातात कोणत्याही स्थितीत अण्वस्त्रे जाऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, त्यामुळे दहशतवाद्यांना संपविण्यासाठी अमेरिका आपली सर्व प्रकारची ताकद वापरेल. (वृत्तसंस्था)भारताचे कौतुकअफगाणिस्तानचा आर्थिक विकास व्हावा आणि प्रगती व्हावी, यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्न व मदतीचे निकी हॅली यांनी कौतुक केले. अफगाणिस्तानला भारताच्या मदतीची गरज आहे. भारत हा त्या राष्ट्रासाठी अत्यंत भरवशाचा व चांगला शेजारी आहे, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :USअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान