शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 17:41 IST

इस्त्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्टभागापासून केवळ २ किमी अंतरावर असताना संपर्क तुटला होता.

नवी दिल्ली - इस्त्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्टभागापासून केवळ २ किमी अंतरावर असताना संपर्क तुटला होता. तेव्हापासून विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चंद्राच्या पृष्टभागावर हार्डलँडिंग केल्यापासून संपर्क तुटलेल्या विक्रमशी आता नासानेही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी नासाकडून विक्रमला ''हॅलो'' मेसेज पाठवण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्टभागापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असताना संपर्क तुटला होता. त्यानंतर विक्रमचे हार्ड लँडिंग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा इस्रोकडून प्रयत्न सुरू आहेत.  दरम्यान, नासाने विक्रम लँडरला रेडिओ संदेश पाठवला आहेत. नासाने डीप स्पेस नेटवर्कच्या जेट प्रपल्शन लॅब्रटरीमधून विक्रमला हा रेडिओ संदेश पाठवला आहे. इस्रोच्या लिखित सहमतीनंतर नासा रेडिओ संदेशांद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे नासामधील सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, विक्रमचे चंद्राच्या पृष्टभागावर हार्डलँडिंग होऊन आता सहा दिवस उलटले आहेत. यादरम्यान, विक्रमशी संपर्क न झाल्याने आता त्याच्याशी संपर्क होण्याची शक्यता हळुहळू धुसर होत आहे. विक्रमसाठी निश्चित करण्यात आलेल्या योजनेनुसार त्याला केवळ एक चांद्रदिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस एवढा वेळ सूर्याचा थेट प्रकाश मिळणार होता. त्यामुळे या काळातच इस्रोकडून विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू राहील. त्यानंतर मात्र चंद्रावरील अंधाऱ्या रात्रीत या यानाशी संपर्क साधणे अशक्य होईल. त्यामुळे २०-२१ सप्टेंबरपर्यंत विक्रमशी संपर्क न झाल्यास त्याच्याशी संपर्क होण्याची आशा संपुष्टात येईल.   

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2NASAनासाisroइस्रो