शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 02:04 IST

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड्डाणात मंगळ भूमीवर ८७२ फूटांची सैर केली.

वॉशिंगटन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या पर्सेव्हेरन्स रोव्हरने मंगळावर उडविण्यात आलेल्या इन्जेन्युईटी हेलिकॉप्टरच्या पात्यांचा भिरभिरता आवाज रेकॉर्ड केला आहे. मंगळावर अशा प्रकारचा आवाज रेकॉर्ड करण्याची ही पहिलीच घटना आहे. हेलिकॉप्टर उड्डाणाचा नवा व्हिडिओ नासाने शुक्रवारी जारी केला. या व्हिडिओसोबत ऑडिओ ट्रॅकही आहे. रोटोरक्राफ्ट प्रकारातील हे हेलिकॉप्टर सहाचाकी असून मंगळभूमीवरील त्याचे हे चौथे उड्डाण आहे. ३० एप्रिल रोजी हे उड्डाण करण्यात आले होते. (Helicopter wings sound record by NASA on Mars)

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड्डाणात मंगळ भूमीवर ८७२ फूटांची सैर केली.

रोव्हरवरील ‘सुपरकॅम मार्स मायक्रोफोन’ने ही कामगिरी केली. मायक्रोफोन विकसित करणाऱ्या टीमचे प्रमुख तथा फ्रान्सच्या ‘ईसाए-सुपाएरो’ संस्थेतील प्रा. डेव्हिड मिमॉन म्हणाले, हा सुखद धक्का आहे. मंगळाच्या वातावरणात आवाज पकडणे जवळपास अशक्य होते. इन्जेन्युईटी उड्डाणाचे नवे रेकॉर्डिंग मंगळाचे वातावरण समजून घेण्यासाठी ‘सोन्याची खाण’ ठरेल. 

विरळ वातावरणामुळे रेकॉर्डिंगचे आव्हान पर्सेव्हेरन्स रोव्हर आणि हेलिकॉप्टर यांच्यात २६२ फूट अंतर होते. इतक्या दुरून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा आवाज मुद्रित करता येईल का, याबाबत या मोहिमेचे अभियंते साशंक होते. तरीही हा आवाज रोव्हरवरील ध्वनी मुद्रण यंत्रणांनी अचूक टिपला. मंगळावरील वातावरण खूपच विरळ आहे. पृथ्वीवरील वातावरणाच्या घनतेच्या तुलनेत मंगळावरील वातावरणाची घनता केवळ १ टक्का आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत तेथे प्रत्येक आवाज मंद होतो. या पार्श्वभूमीवर आवाज टिपण्याचे काम अधिक कठीण होते. 

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रह