शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये उष्णतेचा'चा प्रकोप, 65 जणांचा मृत्यू, 22 हजार रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 14:48 IST

मुसळधार पाऊस आणि महापुराच्या तडाख्यातून नुकत्याच सावरत असलेल्या जपानला आता कडक उन्हाळ्याचा तडाखा बसला आहे.

टोकियो -  मुसळधार पाऊस आणि महापुराच्या तडाख्यातून नुकत्याच सावरत असलेल्या जपानला आता कडक उन्हाळ्याचा तडाखा बसला आहे. गेल्या आठवड्यापासून मंगळवारपर्यंत जपानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे 22 हजार 647 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  जपानमधील फायर अँड डिझास्ट्र मॅनेजमेंट एजन्सीने ही माहिती दिली आहे. एजन्सीने सांगितले की, ते 2008 पासून उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद ठेवत आहेत. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास यावर्षी सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत उष्णतेच्या प्रकोपामुळे 80 जणांच मृत्यू झाला आहे. सुमारे 35 हजार लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हा मुलगा खेळून घरी येत असताना बेशुद्ध झाला. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  सरकारचे प्रवक्ते योशिदे सुगा यांनी सांगितले की, भयंकर लू ने देशाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आपातकालीन पावले उचलावी लागणार आहेत. सरकारी शाळांना वातानुकूलित बनवण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. सद्यस्थितील जपानमधील अर्ध्या शाळांमध्ये एसी लावण्यात आले आहेत. तसेच मुलांना उष्णतेच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी उन्हाळ्याची सुटी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.  सोमवारी कुमागया शहरातील तापमान 41.1 सेल्शियस नोंदवले गेले होते. त्याशिवाय टोकीयोतील शहरी भागात तापमानाने 40 डिग्रीचा आकडा पार केला होता. तसेच जपानमधील बहुतांश भागात सध्या तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे.  

टॅग्स :Heat Strokeउष्माघातJapanजपानweatherहवामान