घातक रोगाचे निदान करणारी तंत्रप्रणाली
By Admin | Updated: October 30, 2014 00:28 IST2014-10-30T00:28:27+5:302014-10-30T00:28:27+5:30
वेळीच निदान झाल्यास प्राणघातक रोग किंवा आजारावर उपचार करून आयुष्य वाढविता येऊ शकते. रोग किंवा आजार बळावण्याधीच त्याला पायबंद कसा घालता येईल,

घातक रोगाचे निदान करणारी तंत्रप्रणाली
सॅनफ्रान्सिको : वेळीच निदान झाल्यास प्राणघातक रोग किंवा आजारावर उपचार करून आयुष्य वाढविता येऊ शकते. रोग किंवा आजार बळावण्याधीच त्याला पायबंद कसा घालता येईल, या दिशेने जगभरातील अनेक संस्था संशोधन करीत आहेत. ‘गुगल’ही अशा पद्धतीने कर्करोग आणि हृदयविकार (कॅन्सर, हार्टअटॅक) यासारख्या जीवघेण्या आजाराचे वेळीच निदान करणारी तंत्रप्रणाली विकसित करीत आहे. गुगलच्या एक्स लॅबमध्ये आयुर्विज्ञान संशोधक पथक या प्रकल्पावर काम करीत आहे.
रासायनिक घटकयुक्त गोळी आणि मनगटी संवेदक यंत्रयुक्त अशीही वैद्यकीय निदान तंत्रप्रणाली आहे. या रोगनिदान तंत्रप्रणालीतहत मानवी शरीरातील कॅन्सर, हृदयविकारासह अन्य प्राणघातक रोगाची लक्षणो वेळीच शोधून संबंधितावर तातडीने उपचार करणो शक्य होईल.
डॉ. अॅन्ड्रय़ू कोनार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रोगनिदान तंत्रप्रणाली विकसित केली जात आहे. डॉ. कोनार्ड यांनी एचआयव्ही टेस्ट चीप विकसित केली असून तिचा आता सर्वत्र वापर केला जात आहे. वैद्यकीय उपचारात सक्रिय आणि प्रतिबंधात्मक उपचार असा बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. कोनार्ड यांनी सांगितले. नॅनोपार्टिकल्समुळे मानवी शरीरातील रेणू आणि पेशीस्तरावरील माहिती अवगत होते. रासायनिक घटकयुक्त गोळीसोबत एक संवेदी यंत्रच्या माध्यमातून अशा रोगांची लक्षणो आढळून आल्यास मनगटावरील संवेदक यंत्रवर त्याची नोंद होते. परिणामी लक्षणानुसार रोगनिदान करणो शक्य होईल. तथापि, हा प्रयोग अद्याप प्राथमिक स्तरावर असल्याचे गुगलने स्पष्ट केले. दोन वर्षापूर्वी गुगलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर टॉम स्टेन्स यांना कारची धडक बसली होती. तातडीने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तातडीने आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असता अंतर्गत रक्तस्त्रव झाला की काय? यासाठी तपासणी केली असताना त्यांच्या मूत्रपिंडात गाठ असल्याचे आढळून आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात आल्याने टॉम आज कॅन्सरमुक्त आहे. त्याच्यापासून ‘गुगल’ला या रोगनिदान तंत्रप्रणाली विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. टॉम गुगलच्या एक्स लाईफ सायन्स टीमचा सदस्य आहे.(वृत्तसंस्था)
4गोळीच्या माध्यमातून रक्तप्रवाहात नॅनोपार्टिकल मिसळल्यानंतर शरीरातील रोगांची लक्षणो टिपली जातील आणि त्याची माहिती मनगटी घडय़ाळ्य़ासारख्या संवेदक यंत्रर्पयत पोहोचती होतील. त्यामुळे डॉक्टरांना वेळेआधीच योग्य ते वैद्यकीय उपचार करून संबंधित व्यक्तीचे रोगापासून संरक्षण करणो शक्य होईल.