शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

तालिबानींच्या दहशतीने अफगाणिस्तानात हाहाकार, लोक देश सोडून पळू लागले; विमानतळांवर प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:27 IST

Afghanistan : तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे.

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारीच देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. राष्ट्रपती निवासानंतर घनी यांचे कार्यालयही तालिबानी नेत्यांनी सोमवारी ताब्यात घेतले आणि तिथे आपला झेंडा लावला. ९० टक्के अफगाण तालिबानींनी ताब्यात घेतला आहे.तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. त्या नागरिकांना मृत्यूपेक्षाही तालिबानचीच अधिक भीती वाटत आहे. विमानतळावर तालिबानला कब्जा करता आला नसून ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने आपला दूतावासच  विमानतळावर हलविला आहे. तालिबानी तिथे हल्ले करतील या शक्यतेने तिथे मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैनिक तैनात आहेत.  सततच्या संघर्षामुळे अफगाणिस्तानात २००१ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, सैनिक, बंडखोरांसह एकूण १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ४३ हजार नागरिक, ४४ हजार अफगाण सैनिक आणि ४२ हजार बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर २०१९नंतर १३ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते. (वृत्तसंस्था) 

शेकडो भारतीय अडकून पडले भारतीय दूतावासातील २०० कर्मचारी व २०० इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसही तिथे अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान काबूलला पोहोचले. याशिवाय २०० शीख बांधव तेथील गुरुद्वारात आहेत. तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने भारतीयांना आणण्यास गेलेले विमान काबूलमध्ये अडकले आहे. गुरुद्वारात अडकलेले शीख नागरिक सुरक्ष‍ित असल्याची माहिती दिल्लीतील गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख मनजीतसिंग शिरसा यांनी  दिली. 

महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य धोक्याततालिबानने २० वर्षांनी सत्ता काबीज केल्यावर जगाशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचा दावा केला. मात्र, लूटमार, महिलांवर अत्याचार याची भीती नागरिकांमध्ये आहे. तालिबानने महिलांवर निर्बंध घातले. अफगाणी महिलांना शिक्षण, नोकरीचे स्वातंत्र्य होते. आता महिलांचे हाल होतील, अशी भीती आहे. 

भारतीयांची गुंतवणूक धोक्यात भारतासह काही देशांनी अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली. अनेक भारतीयांनी तेथे व्यवसाय सुरू केले. आज या गुंतवणुकीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतातील अफगाणी नागरिकांचीही चिंता वाढली आहे. भारतात अनेक अफगाणी विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. इतर नागरिकही आहेत. एकीकडे मायदेशी कुटुंबीयांची चिंता तर दुसरीकडे व्हिसाशी संबंधित प्रश्न, अशा दुहेरी संकटात हे विद्यार्थी तसेच अनेक नागरिक अडकले आहेत.

उडत्या विमानातून दोघे कोसळलेहजारो नागरिक थेट विमानांत घुसू पाहत आहेत. तिथे धक्काबुक्की, भांडणे हाणामारी सुरू आहे. अमेरिकी लष्कराच्या  विमानात शिरण्यासाठी  शिडीवर चेंगराचेंगरी झाली. काही जण विमानावर चढले. दोघे विमानाच्या चाकांमध्ये बसले. विमानाने उड्डाण घेताच ते खाली पडून मरण पावले. विमानाच्या मागेही लोक धावत होते. लोकांना पांगवण्यासाठी तिथे करण्यात आलेल्या गोळीबारात पाच ठार झाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान