असा सिंह पाहिला आहे का तुम्ही?
By Admin | Updated: April 14, 2017 01:09 IST2017-04-14T01:09:51+5:302017-04-14T01:09:51+5:30
सिंह तर तुम्ही खूप बघितले असतील; पण असा सिंह कदाचित कधी बघितला नसेल. आता यात विशेष काय आहे? असा सवालही कोणी करू शकते. जरा बारकाईने

असा सिंह पाहिला आहे का तुम्ही?
बीजिंग : सिंह तर तुम्ही खूप बघितले असतील; पण असा सिंह कदाचित कधी बघितला नसेल. आता यात विशेष काय आहे? असा सवालही कोणी करू शकते. जरा बारकाईने या सिंहाचे निरीक्षण करा. तुम्हाला वस्तुस्थिती समजली तर हसू आवरता येणार नाही. तर या सिंहाचे वैशिष्ट्य हे आहे की, हा कुत्रा आहे. काय खरं वाटत नाही? चीनमधील एका प्राणी संग्रहालयातील एका सुरक्षा रक्षकाने हा खटाटोप केला आहे. चक्क एका कुत्र्यालाच त्याने सिंहाचे रूप दिले आहे. सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक जण काय काय नाही करत.
कोणी सीसीटीव्ही, सेन्सर लावतात. कोणी कुत्रे पाळतात; पण या कुत्र्याला चक्क सिंहाचे रूप देऊन या सुरक्षा रक्षकाने कमालच केली आहे. टिष्ट्वटरवर व्हायरल झालेला हा फोटो पाहून अनेकांना हसू न फुटले तर नवल.