भरपूर सेक्स करा, जन्मदर वाढवा - डेन्मार्कमध्ये मोहीम
By Admin | Updated: October 18, 2015 13:55 IST2015-10-18T13:50:23+5:302015-10-18T13:55:14+5:30
डेन्मार्कमध्ये जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी विवाहीत दाम्पत्यांमध्ये सेक्सचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

भरपूर सेक्स करा, जन्मदर वाढवा - डेन्मार्कमध्ये मोहीम
ऑनलाइन लोकमत
कोपनहेगन, दि. १८ - भारतात लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना डेन्मार्कमध्ये जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी विवाहीत दाम्पत्यांमध्ये सेक्सचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. डेन्मार्कमध्ये सध्या do it denmark अशी मोहीमच सुरु असून या मोहीमेच्या जाहिरातीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे
डेन्मार्कमध्ये जन्मदराचे सध्याचे प्रमाण १.७ एवढे असून लोकसंख्येचे प्रमाण वाढवण्यासाठी डेन्मार्कमध्ये गेल्या वर्षभरापासून मोहीम सुरु आहे. गेल्या वर्षी डेन्मार्कमधील एका जाहिरात कंपनीने do it denmark ही मोहीम राबवली होती. यामध्ये डेन्मार्कमधील दाम्पत्त्यांनी जास्त जास्त प्रमाणात भ्रमंती करावी असे आवाहन करण्यात आलो होते. सुट्टीवर असताना दाम्पत्त्यांमध्ये शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढते असे एका सर्वेक्षणातून समोर आले होते. याचाच आधार घेत ही मोहीम सुरु करण्यात आली होती. आता 'Do it Denmark, do it for mom' या नावाने नवी जाहिरात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नातवंडांना बघण्यासाठी डेन्मार्कमधील मातांनी त्यांच्या वयस्क मुलांना सुट्टीवर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. या जाहीरातीमध्ये अनेक महिला स्वखुषीनेच त्यांच्या मुलांना सुट्टीवर पाठवताना दिसतात. त्यामुळे या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे.