घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 12:39 IST2017-01-24T08:52:02+5:302017-01-24T12:39:56+5:30

एका तरूणीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूक लाईव्हवर दाखवल्याची घृणास्पद घटना स्वीडनमध्ये घडली आहे.

Hateful - gang rape Facebook Live | घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live

घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live

>ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम (स्वीडन), दि. २४ - एक तरूणीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूक लाईव्हवर दाखवल्याप्रकरणी तीन तरूणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्वीडनमधील उप्पसलामध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. एका सतर्क महिलेने याप्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी उप्पसलामधील एका अपार्टमेंटधून तिघांना ताब्यात घेतले. 
फेसबुकवर एक क्लोज ग्रुप असून या ग्रुपमध्ये सुमारे ६० हजार सदस्य आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तीन नराधमांनी तरूणीवर सामूहिक अत्याचार करतानाच त्याचे चित्रण केले आणि ६० हजार मेंबर्स असलेल्या एका क्लोज्ड ग्रुपवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. हे पाहताच जोसफिन ल्यूडग्रेन या २१ वर्षीय तरूणीने पोलिसांना फोन करून या धक्कादायक घटनेची माहिती दिली. त्या नराधमांनी सामूहिक बलात्काराचे फोटो स्नॅपचॅटवरही शेअर केले होते. याप्रकरणी पोलिसांनी १८, २० आणि २४ वर्षाच्या तीन तरुणांना अटक केली असून सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. फेसबुकवरुन हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. 

Web Title: Hateful - gang rape Facebook Live