शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हॅशटॅग #ResigneModi फेसबुकनं केला ब्लॉक, युजर्संच्या संतापानंतर FB चं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 10:24 IST

फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती.

ठळक मुद्देलोकशाहीमध्ये असं चालतं का? असा सवाल ट्विटर युजर्सं शिवम शंकर सिंह यांनी विचारला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचं मोठं संकट असून सरकारी यंत्रणा या लढाईत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, हाताबाहेर चाललेली परिस्थिती आणि अपुरी पडणारी यंत्रणा पाहून लोकांचा राग अनावर होत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरुन सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. तसेच, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात येत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर #ResignModi हा हॅशटॅग चालविण्यात येत होता. मात्र, 28 एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला. 

फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. त्यानंतर, काही युजर्संने फेसबुकच्या या हॅशटॅग ब्लॉकच्या घटनेची ट्विटरवरुन तक्रार केली. त्यावेळी, हॅशटॅग #ResignModi हा कंटेट आमच्या फेसबुक कम्युनिटी स्टँडर्सच्या विरुद्ध आहे, असा मेसेज युजर्संना दिसत होता. दरम्यान, याप्रकरणी फेसबुककडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.  हॅशटॅग ब्लॉक होणे हा तांत्रिक बिघाड असून योगायोग होता. आता, तो हॅशटॅग रिस्टोर म्हणजे पुनर्स्थापित करण्यात आला आहे. भारत सरकारकडून यासंदर्भात कसलेही निर्देश मिळाले नव्हते, असेही फेसबुकच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडून चुकीनं हा हॅशटॅग ब्लॉक झाला होता. दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल अनेकांना नाराजी व्यक्त केलीय. 

लोकशाहीमध्ये असं चालतं का? असा सवाल ट्विटर युजर्सं शिवम शंकर सिंह यांनी विचारला आहे. 

खासदार महुओ मोईत्रा यांनीही विचारला होता सवाल

देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर होत आहे. त्यातच, ट्विटवरुन सर्वाधिकपणे टीका केली जात आहे. त्यामुळे सरकारविरोधातील काही जणांचे ट्विट्स काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. सरकारच्या या आदेशानंतर अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. सत्य कसं डिलीट होऊ शकतं, असे मोईत्रा यांनी म्हटलंय.  

टॅग्स :FacebookफेसबुकNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटर