शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

संघर्षादरम्यान Israel च्या पंतप्रधानांची कठोर भूमिका; म्हणाले, "कारवाई तोवर सुरू राहणार जोवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 16:19 IST

Israel - लोकांचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न : बेंजामिन नेतन्याहू

ठळक मुद्देलोकांचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न : बेंजामिन नेतन्याहूहमासकडून जाणूनबुजून सामान्य लोकांमागे लपून त्यांना नुकसान करत असल्याचं नेतन्याहू यांचं वक्तव्य

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या वाद (Israel-Palestine conflict) अजून चिघळत चालला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हमास (Hamas) जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. "जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत गाझामध्ये हल्ले सुरूच राहतील आणि लोकांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी इस्रायल पूर्ण प्रयत्न करेल," असंही त्यांनी शनिवारी स्पष्ट केलं. 

"या संघर्षासाठी जे जबाबदार आहे तो इस्रायल नाही. यासाठी ते जबाबदार आहेत ज्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही कारवाईच्या मध्यात आहोत. कारवाई अद्याप संपली नाही. जोपर्यंत गरज असेल तोवर ही कारवाई सुरूच राहिल," असंही नेतन्याहू यांनी माध्यमावर बोलताना सांगितलं. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

"हमास जाणूनबुजून सामान्य लोकांच्या मागे लपून त्यांना नुकसान पोहोचवण्याची भूमिका बाळगतो. आम्ही सामान्य लोकांना कोणतंही नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधत आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

इस्रायलकडून एअरस्ट्राईकइस्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग खाली करण्याचा इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात १२ मोठ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. "इस्त्रायली सैन्याने गाझामधील एपीच्या ब्युरो आणि अन्य मीडियाच्या बिल्डिंगला लक्ष्य केले. त्यामुळे मोठा धक्का बसला असून भीतीचे वातावरण आहे," असं असोसिएट प्रेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी प्रुइट यांनी एका निवेदनात म्हटलं. तर अल जजीरा जेरुसलेमचे रिपोर्टर हॅरी फॉसेट म्हणाले की, "आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय वैयक्तिक क्षण आहे. हा विचार करा की, आता ती जागी नाही आहे, विचार करण्यासाठी विलक्षण आहे." 

टॅग्स :Israelइस्रायलGaza Attackगाझा अटॅकPalestineपॅलेस्टाइनBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू