शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'हॅन्ड्स ऑफ' प्रोटेस्ट...!': ट्रम्प-मस्क यांच्या विरोधात लोक भडकले, हातात पोस्टर घेऊन 1200 ठिकाणी रस्त्यावर उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 11:04 IST

अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 1200 हून अधिक ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या अमेरिकेसंदर्भातील धोरणांविरोधात हे ‘हॅन्ड्स ऑफ’ आंदोनल अथवा निदर्शन करण्यात आले. या निदर्शनात 150 हून अधिक संघटनांनी भाग घेतला होता...

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देश चालविण्याची पद्धत आणि त्यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकेतील लोक संतापले असून, ते आपला राग व्यक्त करण्यासाठी हजारोंच्या संखेने हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. या संतप्त लोकांनी देशभर विविध ठिकाणी निदर्शने केली. महत्वाचे म्हणजे, हे अमेरिकेतील विरोधकांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे.  

अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 1200 हून अधिक ठिकाणी ‘हॅन्ड्स ऑफ’ आंदोनल -अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 1200 हून अधिक ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या अमेरिकेसंदर्भातील धोरणांविरोधात हे ‘हॅन्ड्स ऑफ’ आंदोनल अथवा निदर्शन करण्यात आले. या निदर्शनात 150 हून अधिक संघटनांनी भाग घेतला होता. यात, सिव्हिल राइट्स ऑर्गनायझेशन्स, लेबर युनियन, LGBTQ+ चे वकील, निवडणूक कार्यकर्त्यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता. अमेरिकेतील रिपब्लिकन राजवटीच्या सुरुवातीच्या आठवड्यांत आलेल्या अपयशानंतर करण्यात आलेले हे निदर्शन शांततेत पार पडले.

अनेक राज्यांच्या राजधान्यांपर्यंत हजारो निदर्शक हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर - अमेरिकेच्या मिडटाउन मॅनहॅटनपासून अँकोरेज, अलास्का, तसेच अनेक राज्यांच्या राजधान्यांपर्यंत हजारो निदर्शक हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी काढण्यात आलेल्या सर्वच रॅल्यांमधून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि DOGE प्रमुख एलोन मस्क यांच्यावर, संघीय संस्थांमधून हजारो लोकांना काढून टाकणे, अर्थव्यवस्था, इमिग्रेशन आणि मानवी हक्क आदी मुद्द्यावरून जोरदार टीका करण्यात आली.

पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत रॅली... -अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉन आणि लॉस एंजेलिसमध्येही हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आणि ट्रम्प सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली, दरम्यान, पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत रॅलीही काढल्या. 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कagitationआंदोलन