निर्वासितांत आयएसचा हस्तक? जर्मनीत चौकशी
By Admin | Updated: September 20, 2015 22:34 IST2015-09-20T22:31:11+5:302015-09-20T22:34:58+5:30
सिरियामध्ये इस्लामिक स्टेटसाठी (आयएस) लढला असल्याच्या संशयावरून जर्मनीचे पोलीस निर्वासितांसाठीच्या केंद्रातील एकाची चौकशी करीत आहेत

निर्वासितांत आयएसचा हस्तक? जर्मनीत चौकशी
बर्लिन : सिरियामध्ये इस्लामिक स्टेटसाठी (आयएस) लढला असल्याच्या संशयावरून जर्मनीचे पोलीस निर्वासितांसाठीच्या केंद्रातील एकाची चौकशी करीत आहेत, असे वृत्त रविवारी ‘वेल्ट अॅम सोनटॅग’ने दिले.
हा संशयित सिरियाचा नागरिक असून, तो सध्या निर्वासितांसाठी असलेल्या उत्तरपूर्व भागातील बँ्रडेंनबर्ग येथील केंद्रात राहत आहे, असे या वृत्तात सुरक्षा दलांचा हवाला देऊन म्हटले आहे. या संशयिताने या केंद्रातील इतर निर्वासितांना मी आयएस गटासाठी लढलो असल्याचे व लोकांना ठार मारल्याचे सांगितल्याचा आरोप केल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्याचा हा दावा इतर निर्वासितांनी मोबाईल फोनवर त्याला कळू न देता रेकॉर्ड (चित्रीकरण) केला व तेथून पुढे चौकशी सुरू झाली.
या पार्श्वभूमीवरही जर्मनीच्या पोलिसांना निर्वासितांच्या लोंढ्यातून जर्मनीत इस्लामी अतिरेकी शिरकाव करीत असल्याची खात्री वाटत नाही. (वृत्तसंस्था)