शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हमासने इस्त्रायलमधील १३, थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली; रेड क्रॉस त्यांना इजिप्तला घेऊन जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 21:26 IST

इस्रायल आणि हमास यांच्यातील करारात ओलिसांची सुटका करण्याचे ठरले होते. त्यासाठी चार दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता.

हमासने इस्रायलमधील १३ आणि थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली आहे. त्याला रेड क्रॉसकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व ओलिसांना गाझा बाहेर पाठवले जात आहे, तेथून ते इजिप्तमध्ये जातील आणि तेथे त्यांना इस्रायलच्या ताब्यात दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, राफापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही म्हणून भांडण; पत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

इस्रायल आणि हमास यांच्यातील करारात ओलिसांची सुटका करण्याचे ठरले होते. त्यासाठी चार दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. हमास ५० इस्रायली ओलिसांची सुटका करेल आणि इस्रायलला १५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल, असे या करारात ठरले होते. या करारांतर्गत शुक्रवारी हमासने १३ इस्रायली ओलीसांची सुटका केली. आता इस्रायलला प्रत्येक ओलीसाच्या बदल्यात ३ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागणार आहे. याशिवाय हमासने थायलंडमधून १२ ओलिसांची सुटका केली आहे. खुद्द थायलंडच्या पंतप्रधानांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांना घेण्यासाठी थायलंड दूतावासातील अधिकाऱ्यांचे पथकही येत आहे. हमासने बनवलेल्या थाई ओलिसांची सुटका हा युद्धबंदीचा भाग नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरने इस्रायलला आणले जाईल

रेड क्रॉस हमासने सोडलेल्या १३ इस्रायली ओलिसांना इजिप्तमध्ये नेत आहे. तेथून या सर्व ओलीसांना हेलिकॉप्टरने इस्रायलला नेण्यात येणार आहे. दुसरीकडे, ओलिसांच्या सुटकेच्या वृत्तानंतर मोठ्या संख्येने लोक इजिप्त आणि गाझाच्या रफाह सीमेवर पोहोचले आहेत. त्यांच्यामध्ये अनेक ओलीसांचे कुटुंबीय आहेत जे आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी सीमेवर दीर्घकाळ वाट पाहत आहेत.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री योव गॅलांट हे हमासच्या ओलिसांच्या सुटकेपासून ते इस्रायलमध्ये येण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. इस्रायलच्या पीएमओनुसार, दोन्ही नेते IDF लष्करी मुख्यालयाच्या कमांड सेंटरमध्ये राहतील.'हमासच्या बंदिवासातून सोडलेल्या इस्रायलींना इस्रायलमध्ये परत आणण्याच्या ऑपरेशनच्या व्यवस्थापनाबाबत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री अद्ययावत माहिती घेतील.'

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल