हाफीजच्या संघटनेने आपले नाव बदलले
By Admin | Updated: February 5, 2017 00:53 IST2017-02-05T00:53:00+5:302017-02-05T00:53:00+5:30
पाकिस्तानातील कुख्यात अतिरेकी संघटना ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख हाफीज सईद याच्यावर गृहकैदेची कारवाई करताच या संघटनेने आपले नाव बदलून कारवाया सुरूच

हाफीजच्या संघटनेने आपले नाव बदलले
इस्लामाबाद : पाकिस्तानातील कुख्यात अतिरेकी संघटना ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख हाफीज सईद याच्यावर गृहकैदेची कारवाई करताच या संघटनेने आपले नाव बदलून कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. ‘तेहरिक आझादी जम्मू अॅड कश्मीर’ (टीएजेके) असे नवे या संघटनेने धारण केले आहे.
‘टीएजेके’ने प्रत्यक्ष कारवाया सुरूच केल्या आहेत. संघटनेकडून ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात ‘काश्मीर दिन’ पाळण्यात येत आहे. लाहोर व अन्य शहरांत संघटनेचे फलक झळकले आहेत. लाहोरमध्ये नमाजनंतर ‘काश्मीर परिषद’ होणार आहे. लाहोर व अन्यत्र संघटनेची देणगी संकलन केंद्रे आधीच सुरू झाली आहेत. पंजाब हे हाफिज सईदच्या कारवायांचे मुख्य केंद्र आहे.
हाफीजच्या गृहकैदेनंतर दोन्ही संघटनांची कार्यालये सोमवारी बंद करण्यात आली. पाकिस्तानातील दहशतवादविरोधी कायदा-१९९७ अन्वये या संघटनांवर नजर ठेवल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)