हाफिज सईदचा भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट
By Admin | Updated: December 19, 2014 05:35 IST2014-12-17T16:18:50+5:302014-12-19T05:35:30+5:30
मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

हाफिज सईदचा भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए ) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार हाफिज सईदच्या रडारवर दिल्लीतील दोन हॉटेल्स आणि नवी दिल्ली-आग्रा हायवे रोड आहे. तसेच मेट्रो सुध्दा त्याच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच शहरातील शाळा आणि मॉल्सच्या परीसरातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे येत्या २६ जानेवारी स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. बराक ओबामा यांच्या आगमनाआधी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात यासाठी देशभरात कडक सुरक्षा ठेवण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.