हाफिज सईदच्या पक्षाची खाती फेसबुकने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 04:48 IST2018-07-16T04:48:26+5:302018-07-16T04:48:33+5:30

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने स्थापन केलेल्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ (एमएमएल) या मान्यता नसलेल्या राजकीय पक्षाची आणि त्यांनी उभ्या केलेल्या अनेक उमेदवारांची फेसबूक खाती आणि पेजेस ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बंद करण्यात आली.

Hafiz Saeed's party closes Facebook accounts | हाफिज सईदच्या पक्षाची खाती फेसबुकने केली बंद

हाफिज सईदच्या पक्षाची खाती फेसबुकने केली बंद

लाहोर : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने स्थापन केलेल्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ (एमएमएल) या मान्यता नसलेल्या राजकीय पक्षाची आणि त्यांनी उभ्या केलेल्या अनेक उमेदवारांची फेसबूक खाती आणि पेजेस ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बंद करण्यात आली.
फेसबूकच्या अधिकाऱ्यांनी पाक निवडणूक आयोगाशी संपर्क साधून विविध राजकीय पक्षांची बनावट फेसबुक खाती व पेजेस हुडकून ती बंद करण्याच्या कामी स्थानिक अधिकाºयांना मदत देऊ केली. त्यानुसार हाफिज सईदच्या पक्षाची आणि त्यांच्या उमेदवारांची फेसबुक खाती बंद केली आहेत.

Web Title: Hafiz Saeed's party closes Facebook accounts