पाकिस्तानातील हिंदूंच्या मंदीरांचं संरक्षण करणार - हाफीज सईद
By Admin | Updated: May 3, 2016 18:18 IST2016-05-03T15:20:36+5:302016-05-03T18:18:52+5:30
पाकिस्तानमधल्या हिंदूंच्या मंदीरांचा विध्वंस होऊ देणार नाही असं वक्तव्य जमात उल दावा या संघटनेचा प्रमुख हाफीज सईदने केलं आहे

पाकिस्तानातील हिंदूंच्या मंदीरांचं संरक्षण करणार - हाफीज सईद
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 3 - पाकिस्तानमधल्या हिंदूंच्या मंदीरांचा विध्वंस होऊ देणार नाही, असं वक्तव्य जमात उल दावा या संघटनेचा प्रमुख हाफीज सईदने केलं आहे. मुंबईवरच्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासाठी हाफीज सईदला मुख्य आरोपी म्हणून भारताने घोषित केले असताना आणि पाकिस्तानने त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असताना सईदचं हे वक्तव्य अनेकांसाठी धक्कादायक आहे.
सिंध प्रांतातल्या एका सभेत बोलताना सईदनं हिंदू बांधवांच्या प्रार्थनास्थळांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य असल्याचं म्हटलं आहे. अन्य धर्मींयांच्या प्रार्थनास्थळांना आम्ही तोडू देणार नाही, असं सांगणाऱ्या सईदनं भारताच्या आरोपांचं खंडन केलं आहे. मदरशांच्या माध्यमातून कट्टर पंथीयांना सईद प्रोतास्हन देत असल्याचा आरोप असून आपण असं काही करत नसल्याचा दावा त्यानं केला आहे.