हाफिज सईद पुन्हा पाकमध्ये बरळला
By Admin | Updated: April 21, 2015 00:26 IST2015-04-21T00:26:21+5:302015-04-21T00:26:21+5:30
लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हाफिज सईदने पुन्हा भारताविरोधी विखारी जहर उगाळले असून,

हाफिज सईद पुन्हा पाकमध्ये बरळला
पेशावर : लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हाफिज सईदने पुन्हा भारताविरोधी विखारी जहर उगाळले असून, भारत हा पाकचा नंबर एकचा शत्रू आहे असे उद्गार काढले आहेत. येथील सभेत सईद बोलत होता.
भारत हा पाकचा नंबर एकचा शत्रू आहे असे सांगून भारताविरोधात जिहाद करा, असे आवाहन त्याने केले. दोन दिवसांपूर्वीच हफीज सईदने पाकिस्तानी सैन्याला भारताविरोधात जिहाद छेडण्यासाठी आपल्या संघटना मदत करतात अशी कबुली दिली होती. पाकिस्तानातील चॅनल २४ ला मुलाखत देताना तो बोलत होता. काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी पाकिस्तान सरकार व लष्कराला आम्ही मदत करतो असे तो या मुलाखतीत म्हणाला होता.
पाकला चोख प्रत्युत्तर
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यालगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर रविवारी रात्री पाकिस्तानी जवानांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.