शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:59 IST

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यापासून हाफिज सईद गुडूप झाला आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा पाकिस्तान असल्याचे भारताने वारंवार म्हटले आहे. भारतात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईत झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच होता. मात्र, हाफिज पाकिस्तानात असल्याचे पाकिस्तानी नेत्यांनी वेळोवेळी नाकारले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यापासून हाफिज सईद गुडूप झाला आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

नुकतेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी, 'भारताने ठावठिकाणा सांगावा, आम्ही हाफिज सईद आणि मसूद अजहर  भारताकडे सोपवू' असे म्हटले होते. तेव्हापासून चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके हा सईद हाफिज याचा तळ मानला जातो. ऑपरेशन सिंदूरमध्ये याच तळावर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हापासून सईद हाफिज हा भूमिगत झाला आहे. 

'त्या' ३ वक्तव्यांमध्ये मोठे संकेत!> ऑपरेशन सिंदूर दरम्यान, १२ मे रोजी, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बीबीसी उर्दूला एक मुलाखत दिली. ख्वाजा यांनी या मुलाखतीत म्हटले की, पूर्वी पाकिस्तानमध्ये दहशतवाद फोफावत होता. सरकारने अमेरिका आणि युरोपच्या इशाऱ्यावरून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला होता, परंतु आता पाकिस्तानमध्ये एकही दहशतवादी नाही. ख्वाजा म्हणाले होते की, मी खात्रीने सांगू शकतो की सध्या पाकिस्तानमध्ये एकही दहशतवादी नाही.

> ५ जुलै २०२५ रोजी अल-जझीराला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि खासदार बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, "हाफिज सईद सध्या कुठे आहे हे मला माहीत नाही. मला वाटते की, हाफिज सध्या अफगाणिस्तानात असेल." अफगाणिस्तान हा पाकिस्तानचा शेजारी देश आहे. दोघांमधील सीमा सुमारे २६०० किमी आहे.

> हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने ६ जुलै रोजी त्याच्या वडिलांबद्दल सांगितले. तल्हा म्हणाला की, "माझे वडील सुरक्षित ठिकाणी आहेत आणि आता त्यांची तब्येतही चांगली आहे." 

आता प्रश्न असा आहे की, हे सुरक्षित ठिकाण पाकिस्तानच्या बाहेर आहे की आत? याची कल्पना कुणालाही नाही.

हाफिजवर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस!२०१५मध्ये अमेरिकेने हाफिज सईदवर १ कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. एका मुलाखतीत हाफिज म्हणाला होता की, "माझ्यावर बक्षीस ठेवण्यात आले आहे, पण कोणीही माझे गुप्त ठिकाण उघड करत नाही. इथल्या लोकांना १ कोटी डॉलर्स नको आहेत."

२०१९ मध्ये, हाफिज सईदला पाकिस्तानी सरकारने नजरकैदेत ठेवले होते, परंतु लवकरच त्याची सुटका करण्यात आली. गेल्या ५ वर्षांत हाफिज पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतात अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी