शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', पाकिस्तानी मंत्र्याने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:03 IST

दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली - दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं की, 'सध्या तो घरकैदेत आहेत. मात्र आम्हाला अजून कडक कारवाई केली पाहिजे हे मान्य करायला हवं. पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत जे पाकिस्तानाच अडचणी असताना डोकेदुखी ठरु शकतात. या मताशी मी सहमत आहे'. 

यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मान्य केलं. मात्र त्यासाठी अजून वेळ हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. 'हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी डोकेदुखी आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सध्या आमच्याकडे ताकद नाही', असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं. 

ख्वाजा आसिफ यांनी यावेळी हाफिज सईद आणि इतर दहशतवादी संघटना मोठ्या होण्यामागे अमेरिकाही तितकीच जबाबदार असल्याचं सांगितलं. 'हाफिज सईदसाठी उगाच आम्हाला दोष देऊ नका. 20 वर्षांपासून त्यांना आपल्या प्रिय लोकांप्रमाणे वागवत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत बसून तुम्ही खाणं, पिणं केलं, आणि आता पाकिस्तानला दोष देता', असं ख्वाजा आसिफ बोलले आहेत. यावेळी अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या प्रॉक्सी वॉरला समर्थन देणं पाकिस्तानला खूपच महागात पडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

आमची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देते, पाकिस्तानी गुप्तचर अधिका-याचा धक्कादायक खुलासापाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिका-यानं धक्कादायक खुलासा केला होता. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत अधिका-यानं इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंतीही त्यानं न्यायालयाला केली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे सहाय्यक उपनिरीक्षक मलिक मुख्तार अहमद शहजाद यांनी हे गंभीर आरोप केले होते. आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. शहजाद यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत न्यायालयात याचिकाही दाखल केली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद