हफीज सईदची साहेब उपाधी युनोने काढली

By Admin | Updated: December 24, 2014 03:27 IST2014-12-24T03:27:16+5:302014-12-24T03:27:16+5:30

जमात उद दवा या संघटनेचा प्रमुख असणा-या हफीज सईद याच्या नावापुढे साहेब ही उपाधी लावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने खेद व्यक्त केला

Hafeez Saeedchi Saheb Upadhyay Uno | हफीज सईदची साहेब उपाधी युनोने काढली

हफीज सईदची साहेब उपाधी युनोने काढली

संयुक्त राष्ट्रे : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दवा या संघटनेचा प्रमुख असणा-या हफीज सईद याच्या नावापुढे साहेब ही उपाधी लावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने खेद व्यक्त केला असून, साहेब ही उपाधी काढून टाकण्यात आली आहे.
सुरक्षा परिषदेतील अल काईदा निर्बंध समितीने हफीज सईदच्या नावे नवे पत्र जारी केले असून, १७ डिसेंबरचे पत्र रद्द केले आहे. याच पत्रात हफीज सईद याचा उल्लेख साहेब म्हणून करण्यात आला होता. आपली ही चूक झाल्याचे सुरक्षा परिषदेने मान्य केले आहे. सुरक्षा परिषदेने १७ डिसेंबरला पाठविलेल्या या पत्रात हफीज सईदला साहेब ही उपाधी लावण्यात आली होती. त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: Hafeez Saeedchi Saheb Upadhyay Uno