शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हॅकरने पाण्यात विष टाकण्याचा केला प्रयत्न, १५ हजार लोकांचा जीव धोक्यात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 12:25 IST

नशीब चांगलं होतं की, एका प्लांट ऑपरेटरने पाण्यात मिश्रित होत असलेल्या विषाचं प्रमाण पाहिलं आणि त्याने लगेच सिस्टीम ठीक केली.

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये सायबर अटॅकची अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे येथील सगळेच घाबरलेले आहेत. एका इंटरनेट हॅकरने फ्लोरिडाच्या एका भागातील पाणी सप्लाय करत असलेल्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये विष टाकण्याचा प्रयत्न केला. या प्लांटमधून १५ हजार लोकांना पाणी सप्लाय केलं जातं. नशीब चांगलं होतं की, एका प्लांट ऑपरेटरने पाण्यात मिश्रित होत असलेल्या विषाचं प्रमाण पाहिलं आणि त्याने लगेच सिस्टीम ठीक केली.

इंटरनेट हॅकरने फ्लोरिडाच्या ओल्डसमार भागातील वॉटर ट्रीटमेंट प्लांटला रिमोटने ऑपरेट केलं. त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट प्लांटमध्ये पाण्यात सोडीअम हायड्रॉक्साइडचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने पाण्यात सोडीअम हायड्रॉक्साइडचं प्रमाण ११,१०० पार्ट्स प्रति मिलियन प्रमाण वाढवलं. हे प्रमाण १०० पार्ट्स प्रति मिलियन असायला हवं.

बिझनेस इनसायडरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ही घटना ५ फेब्रुवारीची आहे.  या ट्रीटमेंट प्लांटमधून ओल्डसमार भागातील १५ हजार लोकांना पाणी सप्लाय होतं. ट्रीटमेंट प्लांटच्या कॉम्प्युटरमध्ये सोडीअम हायड्रॉक्साइडचं प्रमाण वाढताना दिसलं तर एका ऑपरेटरचं त्यावर लक्ष गेलं.

ऑपरेटरने लगेच सप्लाय बंद केला आणि पाण्यातील सोडीअम हायड्रॉक्साइडचं प्रमाण कमी करू लागला. त्याने विष लवकर सामान्य स्थितीत आणलं. यादरम्यान त्याने पोलिसांनाही सूचना दिली. पोलीस अधिकारी बॉब गुआलटिएरी यांनी सांगितले की, आता एफबीआय आणि सीक्रेट सर्व्हिसचे लोक या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते हॅकरचा शोध घेत आहेत.

बॉब गुआलटिएरी यांनी सांगितले की, सोडीअम हायड्रॉक्साइड वापर लिक्विड ड्रेन क्लीनर म्हणून केला जातो. याने पाणी फार अॅसिडीक होतं. हे अशा भागात वापरलं जातं जेथील पाण्यात लाइमस्टोन जास्त प्रमाणात असतं. पण याचा फार कमी प्रमाणात वापर केला जातो. जर याचं प्रमाण पाण्यात जास्त झालं तर पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर रॅशेस येऊ शकतात आणि त्यांना जळजळ होऊ शकते.

बॉब यांनी सांगितले की, चांगली बाब ही होती की, प्लांट ऑपरेटरला अशाप्रकारच्या समस्या सोडवता येत होत्या. त्याने लगेच हुशारी दाखवत आधी प्लांटमधून सप्लाय रोखला. नंतर पाण्यातील सोडीअम हायड्रॉक्साइडचं प्रमाण सामान्य केलं. तसे विषारी पाणी पुन्हा ट्रीट करून ते शुद्ध केलं. बॉब यांनी सांगितले की, जर या सायबर अटॅकची माहिती मिळाली नसती तर या भागात २४ तासात गोंधळ माजला असता. मात्र, वेळीच योग्य नियमांचं पालन केल्याने मोठी दुर्घटना टळली.

ओल्डसमार शहराचे मेअर एरिक शीडल यांनी सांगितले की, अजून हॅकरला पकडण्यात आलेलं नाही. पण त्याने पाण्याची पीएच लेव्हल वाढवली आहे. थोडा उशीर आणखी झाला असता तर मोठी समस्या झाली असती. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

याबाबत तपास करणाऱ्या एजन्सीला विचारले तर त्यांनी सांगितले की, हे अजून समजू शकलेले नाही की, हॅकरने सायबर अटॅक अमेरिकेत बसून केला की, देशाबाहेरून. सोडीअम हायड्रॉक्साइड सामान्य भाषेत अमेरिकत आय म्हणतात.  

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम