शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

एच-१ बी व्हिसा अर्ज शुल्क वाढणार, भारतीय आयटी कंपन्यांवर आर्थिक बोजा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 04:34 IST

शिकाऊ उमेदवार कार्यक्रमाचा निधी वाढविण्यासाठी अमेरिकेचा ‘एच-१बी’ व्हिसा अर्जाचे शुुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे, असे कामगारमंत्री अ‍ॅलेक्झांडर अ‍ॅकोस्टा यांनी संसदीय समितीला सांगितले. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढेल.

 वॉशिंग्टन : शिकाऊ उमेदवार कार्यक्रमाचा निधी वाढविण्यासाठी अमेरिकेचा ‘एच-१बी’ व्हिसा अर्जाचे शुुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे, असे कामगारमंत्री अ‍ॅलेक्झांडर अ‍ॅकोस्टा यांनी संसदीय समितीला सांगितले. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढेल.१ आॅक्टोबर २०१९ पासून सुरू होणाऱ्या २०२० या वित्तीय वर्षासाठी कामगार खात्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सांगितले की, शिकाऊ उमेदवार कार्यक्रमाचा दुरुपयोग करणाºया कंपन्यांपासून अमेरिकन कर्मचाऱ्यांचे अधिक चांगले रक्षण करणे आणि अधिक पारदर्शकतेसाठी एच-१बी अर्जाच्या नमुन्यातही कामगार मंत्रालयाने बदल केला आहे.‘एच-१बी’ व्हिसा अर्जाचे शुल्क किती वाढवणार तसेच कोणत्या श्रेणीच्या अर्जासाठी वाढीव शुल्क लागू असेल, याचा तपशील मात्र त्यांनी दिला नाही. तथापि, मागच्या अनुभवाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, प्रस्तावित शुल्क वाढीमुळे भारतीय आयटी कंपन्यांवर आर्थिक बोजा पडेल. कारण भारतीय आयटी कंपन्यांकडून सर्वाधिक एच-१बी व्हिसासाठी अर्ज सादर केले जातात.विदेशी नागरिकांंना अमेरिकेत तात्पुरता प्रवेश देणारा एच-१बी व्हिसा आहे. अमेरिकी कंपन्यांना तांत्रिक आणि सैद्धातिकदृष्ट्या व्यावसायिक तज्ज्ञांची गरज असते. यासाठी विदेशी कर्मचाºयांना नोकरी देण्याची मुभा या व्हिसाने मिळते. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी भारत आणि चीन यासारख्या देशांतील लाखो कर्मचाºयांची नियुक्ती याच आधारे करतात.डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्टÑाध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारातच स्थानिक अमेरिकी नागरिकांना नोकºयांत प्राधान्य देण्याचा मुद्दा प्रमुख केला होता. त्या अनुषंगाने ते निर्णय घेत आहेत.स्थानिकांना नोकºया मिळण्यासाठी बंधनेच्विदेशी कर्मचाºयांना कमी वेतनावर नोकरी मिळत असल्याने अमेरिकी कर्मचाºयांच्या नोकरीवर गदा येते, असा तर्क देत ट्रम्प प्रशासनाने एच-१ बी व्हिसा कार्यक्रम कडक केला आहे.च्माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात एच-१ बी व्हिसावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांसाठी शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी कामगार विभागाने मागच्या वर्षी १५० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी शिकाऊ उमेदवार कार्यक्रम अनुदान निधी योजना सुरूकेली होती, असे अ‍ॅकोस्टा यांनी सांसदीय समितीला सांगितले.

टॅग्स :United StatesअमेरिकाVisaव्हिसा