व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडवर चढणारा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2015 00:23 IST2015-11-28T00:23:48+5:302015-11-28T00:23:48+5:30

व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडवरून आत जाऊ पाहणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. जोसेफ केप्युरो असे या व्यक्तीचे नाव आहे. दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

Growing Up on the White House's Compound | व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडवर चढणारा पकडला

व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडवर चढणारा पकडला

वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडवरून आत जाऊ पाहणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. जोसेफ केप्युरो असे या व्यक्तीचे नाव आहे. दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेनंतर व्हाईट हाऊसचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ही घटना घडली तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे आतमध्येच होते.
व्हाईट हाऊसच्या उत्तरेकडील भागातून ही व्यक्ती आत प्रवेश करू पाहत होती. या व्यक्तीने यापूर्वीही काही गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया केलेल्या आहेत.

Web Title: Growing Up on the White House's Compound