शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ग्रीन कार्डचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन; भूमिपुत्रांच्या हितासाठी योग्य निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:52 IST

अमेरिकेच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे त्यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : ३१ डिसेंबरपर्यंत ग्रीन कार्ड जारी करणे स्थगित करण्याच्या निर्णयाचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले आहे. अमेरिकेच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे त्यांनी म्हटले आहे.ग्रीन कार्ड देणे ९० दिवसांसाठी स्थगित करण्याचा कार्यकारी आदेश ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये काढला होता. सोमवारी या आदेशाला ३१ डिसेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. मंगळवारी सॅन लुईस येथे पत्रकारांनी त्यांना या मुद्द्यावर छेडले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आता या क्षणी आम्ही अमेरिकी भूमिपुत्रांना नोकºया देऊ इच्छितो. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-१९ साथीमुळे लक्षावधी अमेरिकी नागरिकांचा रोजगार गेला आहे. त्यांना मदत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक होते.येत्या ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, ट्रम्प हे दुसºया कार्यकाळासाठी नशीब अजमावत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी भूमिपुत्रांना नोकºया देण्याचा मुद्दा काढला असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, फेब्रुवारी आणि मे २०२० या काळात अमेरिकेतील बेरोजगारीचा दर जवळपास चौपट झाला आहे. अतिशय उच्च बेरोजगारीच्या दरापैकी हा एक आहे. ग्रीन कार्ड जारी करण्यास स्थगिती देण्यात आल्यामुळे भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी नागरिकत्व मिळण्याची प्रतीक्षा वाढली आहे.>अमेरिकी व्यवसायाला फटका बसणारएच-१बी आणि इतर कामकाजी व्हिसाला तात्पुरती स्थगिती देण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा विदेशी कामगारांवर अवलंबून असलेल्या अमेरिकी व्यवसायांना फटका बसेल, असा इशारा अमेरिकी खासदारांनी दिला आहे. एच-१ बी आणि इतर सर्व कामकाजी व्हिसा २0२0च्या अखेरपर्यंत निलंबित करण्याचा आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जारी केला आहे.काँग्रेस सभागृहाच्या सदस्य तथा आशिया प्रशांत अमेरिकी कॉकसच्या अध्यक्ष ज्युडी चू यांनी सांगितले की, अमेरिकेत आशियातून उच्च कौशल्यधारक कर्मचारी येतात. त्यावर या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होईल. हा पूर्वग्रहदूषित आणि कट्टरवादी अजेंडा असून, त्याचा आपल्या देशहिताला फटका बसेल.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प