युद्ध लादलं तर भारताचेच मोठे नुकसान - पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

By Admin | Updated: August 31, 2015 09:47 IST2015-08-31T09:47:22+5:302015-08-31T09:47:30+5:30

भारताने पाकिस्तानवर युद्ध लादलं तर यात त्यांचेच मोठं नुकसान होईल व हे नुकसान त्यांना अनेक दशकांपर्यंत लक्षात राहिल अशी धमकीवजा इशाराच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिला आहे.

Great losses in India - if war moves - threatens Pakistan's defense ministers | युद्ध लादलं तर भारताचेच मोठे नुकसान - पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

युद्ध लादलं तर भारताचेच मोठे नुकसान - पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ३१ - भारताने पाकिस्तानवर युद्ध लादलं तर यात त्यांचेच मोठं नुकसान होईल व हे नुकसान त्यांना अनेक दशकांपर्यंत लक्षात राहिल अशी धमकीवजा इशाराच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिला आहे. 

भारत - पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी चिथावणीखोर विधान करत यात भर घातली आहे. सीमा रेषेवरील पाकिस्तानमधील गावांचा दौरा करत असताना ख्वाजा मोहम्मद यांनी भारतालाच धमकी दिली. पाकिस्तानी सैन्य कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मातृभूमीच्या एक एक इंचाचे रक्षण करायला सक्षम आहेत. भारताचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून पाकिस्तानमधील दहशतवादाला भारताचा पाठिंबा आहे असा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: Great losses in India - if war moves - threatens Pakistan's defense ministers