शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश  - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:12 IST

देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या तरुणाईच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले

वॉशिंग्टन, दि. 19 - असहिष्णुता आणि वाढती बेकारी हीच भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत यामुळेच भारताची सुरक्षा आणि विकास प्रक्रीया अडचणीत आली असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. 

पुढे बोलताना ते म्हणाले की,  एकूण जगभरातच सध्याच्या काळात सहिष्णुता धोक्यात आली आहे. मात्र भारतातील असहिष्णुतेचे प्रमाण अधिक गंभीर आहे. त्याचप्रमाणे देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या तरुणाईच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे देश भयानक विघातक दिशेने वाटचाल करीत आहे; अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. 

( आणखी वाचा  -नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका )

डेमोक्रॅटिक पक्षाचा थिंक टॅंक समजल्या जाणाऱ्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसने आयोजित केलेल्या अमेरिका स्थित भारतीय, दक्षिण आशियाई तज्ञांबरोबरच्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते.

( आणखी वाचा  - बकवास करु नका ! जबरदस्ती आणि गुंडगिरी करुन लोकांचं प्रेम मिळवता येत नाही, राहुल गांधींवर भडकले ऋषी कपूर )

राहुल गांधींच्या भाषणानंतर उपस्थित त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्याचा दावा काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केला. राहुल यांची जी प्रतीमा आमच्या मनात होती; प्रत्यक्षात ते अतिशय वेगळे आहेत. ते तर्कशुद्ध विचार करणारे, अभ्यासू आहेत. त्यांना समस्यांची जाण आहे; असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते, राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची स्तुतीपंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम प्रवक्ते आहेत अशी कबुली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यापेक्षा चांगले प्रवक्ते असल्याचं मान्य केलं. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. 'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्य आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला बोलले. 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आणि जटिल आहे', असं राहुल गांधी बोलले. नंतर पुढे बोलताना त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस