हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले

By Admin | Updated: May 16, 2015 02:15 IST2015-05-16T02:15:04+5:302015-05-16T02:15:04+5:30

अमेरिकन नौदलाच्या बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष व तीन जळालेले मृतदेह नेपाळमधील भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या मदत कार्यकर्त्यांना

Got helicopter residue | हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले

हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले

काठमांडू : अमेरिकन नौदलाच्या बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष व तीन जळालेले मृतदेह नेपाळमधील भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या मदत कार्यकर्त्यांना मिळाले असून, नुकत्याच झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा आता ११७ पर्यंत पोहोचला आहे.
अमेरिकेच्या नौदलाचे यूएच- १ वाय ह्यूए हेलिकॉप्टर मंगळवारी सहा नौदल अधिकारी व दोन नेपाळी सैनिक यांच्यासह बेपत्ता झाले होते. त्याचदिवशी दुसरा जोरदार भूकंप झाला. बेपत्ता हेलिकॉप्टर शुक्रवारी नेपाळी लष्करी हेलिकॉप्टरला घोरथाली खेड्याजवळ दिसले. डोलखा जिल्ह्यातील कालीनचौक टेकडीवर ११,२०० फूट उंचीवर हे अवशेष मिळाले. अमेरिकन हेलिकॉप्टर सापडल्याच्या वृत्ताला संरक्षण सचिव ईश्वरी प्रसाद यांनी दुजोरा दिला.





 

 

Web Title: Got helicopter residue