शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

 EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकेतील हॅकरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:10 IST

भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक दावा केला आहे.

ठळक मुद्देभारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झालीभाजपाच नव्हे तर आम आदमी पक्षानेही EVM हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, 2015 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला

लंडन - भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक दावा केला आहे. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला आहे.  सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे दावे केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते. भाजपाच नव्हे तर आम आदमी पक्षानेही EVM हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, 2015 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला, असा गौप्यस्फोट या हॅकरने केला आहे. इव्हीएम हॅकिंग संदर्भात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असा आरोपही त्याने यावेळी केला. समाजवादी पक्ष आणि बसपानेही इव्हीएम हॅकिंग करण्यासाठी संपर्क केल्याचा आरोप या हॅकरने केला. काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांना EVM हॅकिंगबाबत माहित असल्याचाही आरोप त्याने केला. 

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने EVM हॅकरचे हे दावे फेटाळून लावले आहेत. लंडनमधील एका कार्यक्रमात भारतातील EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

हे तर काँग्रेसचे कारस्थान, भाजपाचा पलटवार भाजपाने नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी यामागे कारस्थान असल्याचा प्रत्यारोप केला आहे. ''काँग्रेसकडे बरेच फ्रीलान्स नेते आहेत. ते मोदींना हटवण्यासाठी मदत मागण्यासाठी पाकिस्तानमध्येसुद्धा पोहोचतात. येत्या निवडणुकीतील पराभवाची कुणकुण लागल्याने काँग्रेसवाले हॅकिंग हॉरर शो आयोजित करत आहेत. कपिल सिब्बल यांचे तिथे उपस्थित राहणे हा केवळ योगायोग नाही. त्यांना काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी तिथे पाठवले होते, असा आरोपही मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतPoliticsराजकारण