शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुगलमुळे नेत्याला सोडावे लागले राजकारण, आता द्यावी लागणार 4 कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:01 IST

Google-YouTube: 2020 मध्ये YouTuberवर एका नेत्याच्या विरोधात दोन चुकीचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते.

Google-YouTube: आक्षेपार्ह व्हिडीओमुळे गुगलने अनेकदा युजर्सला दंड ठोठावल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, एक वादग्रस्त व्हिडीओ काढून टाकण्यात अयशस्वी ठरल्याने ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने गुगललाच 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, न्यायालयाने म्हटले की, यूट्यूबवरील बदनामीकारक व्हिडिओ डिलीट न केल्यामुळे माजी खासदाराला मुदतीपूर्वीच राजकारण सोडावे लागले. यासाठी, गुगल आता त्या माजी खासदाराला 715,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (US$515,000) ची भरपाई देईल. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत 3 कोटी 99 लाख 95 हजार 183 रुपये आहे.

लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिलाफेडरल कोर्टाला आढळले की, कंटेंट-शेअरिंग वेबसाइट YouTube ची मालक कंपनी अल्फाबेट इंकने, न्यू साउथ वेल्सच्या तत्कालीन उप-प्रीमियरवर हल्ला करणारे दोन व्हिडिओ प्रसारित करून पैसे कमवले. 2020 मध्ये पोस्ट केल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्समध्ये सुमारे 800,000 लोकांनी ते व्हिडिओ पाहिले.

नेत्याला राजकारण सोडावे लागलेन्यायाधीश स्टीव्ह रेयर्स म्हणाले की, राजकीय समालोचक जॉर्डन शँक्सच्या व्हिडिओने जॉन बॅरिलारोच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ठोस पुराव्याशिवाय त्यांना भ्रष्ट घोषित करण्यात आले. त्यांच्यावर अपशब्दाचा वापर आणि वर्णद्वेषी टीकाही केली. गुगल आणि मिस्टर शँक्सच्या चुकीच्या प्रचारामुळे दुखावलेल्या जॉन बॅरिल्लारो यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये राजकारण सोडले. या संपूर्ण प्रकरणात गुगलची वागणूक चुकीची आणि अन्यायकारक होती. त्यामुळे त्याच्यावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

टॅग्स :googleगुगलYouTubeयु ट्यूबAustraliaआॅस्ट्रेलिया