शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

गुड न्यूज! चीनमध्ये २४ तासांत नाही एकही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:30 AM

राष्ट्रीय आरोग्य आयोगाची माहिती : जानेवारीपासून प्रथमच दिवसात एकही बळी नाही; अनेक ठिकाणी लॉकडाऊन हटवले

नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे माहेरघर ठरलेल्या चीनमधून एका आनंदाची बातमी आहे. तेथे ‘कोविड-१९’ या जीवघेण्या आजारामुळे गेल्या २४ तासांत एकही मृत्यू झालेला नाही.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या ‘कोविड-१९’ या अतिशय घातक अशा संसर्गजन्य रोगाचा जन्म चीनमधील वुहान शहरातून झाला. तेथून तो जगभर पसरला. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. असे असतानाच ‘मागील २४ तासांत आमच्या देशात कोरोना विषाणूमुळे एकही मृत्यू झालेला नाही,’ असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी अधिकृतरित्या जाहीर केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण मागील वर्षी १० डिसेंबर रोजी आढळला होता. यंदा जानेवारीपासून तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याची आकडेवारी द्यायला प्रारंभ केला. तेव्हापासून या विषाणूमुळे मृत्यू झाला नाही, असे आजच पहिल्यांदा घडले. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून ‘कोविड-१९’चे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे. चीननंतर लागण झालेल्या इटली, स्पेन, अमेरिका या देशांना मात्र या रोगाचा भयानक फटका बसला आहे. इटलीत एकूण १ लाख ३२ हजार ५४७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ हजार ५२३ जणांचा बळी गेला.

स्पेनमध्ये १ लाख ४० हजारांवर रुग्णांपैकी १३ हजार ७९८ जणांना प्राण गमवावे लागले. जगात आतापर्यंत आढळलेल्या सुमारे १३ लाख ७९ हजार रुग्णांपैकी सर्वाधिक ३ लाख ७७ हजार एकट्या अमेरिकेतील आहेत. तेथे आतापर्यंत ११ हजार ७८१ नागरिकांचा बळी गेला आहे.८१ हजार ७४० पैकी ७७ हजार १६७ रुग्ण बरे!४चीनमध्ये आतापर्यंत ८१ हजार ७४० रुग्ण आढळले असून त्यापैकी ७७ हजार १६७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तेथे कोरोना विषाणूचे आजघडीला केवळ १ हजार १४२ रुग्ण आहेत. ‘कोविड-१९’ या रोगाने तेथे आतापर्यंत ३ हजार ३३१ बळी घेतले आहेत.४मागील २४ तासांत चीनमध्ये ३२ नवे रुग्ण आढळले आहेत.मात्र, ते सर्व विदेशी नागरिक आहेत. चीनमध्ये जनजीवनहळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येत आहे. वुहान शहरातील लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आले नसून तरी तेथील स्थानिक प्रशासनाने ४५ परिसरांना ‘महामारीमुक्त’ घोषित केले आहे. लॉकडाऊन हटविण्याची ही प्रक्रिया सुरू असतानाच जगातील अनेक देशांनी चीनला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या