Iran on Hormuz: मध्य आशियातील युद्धाचा वणवा आता समुद्रापर्यंत पोहोचला असून, जगाची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत इराणने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. मात्र, या तणावाच्या वातावरणात भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जाहीर केले आहे की, हा जलमार्ग अमेरिका, इस्रायल आणि युरोपसाठी पूर्णपणे बंद असेल, मात्र भारत आणि चीनच्या जहाजांना यातून सुरक्षित प्रवासाची मुभा असेल.
पश्चिमेकडील देशांना नष्ट करण्याचा इशारा
इराणच्या सरकारी प्रसारक वाहिनीवरून गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. "अमेरिका, इस्रायल, युरोप किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे कोणतेही जहाज या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करेल, तर त्यावर थेट हल्ला करून ते नष्ट केले जाईल," अशी उघड इशारा इराणने दिला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धाच्या काळात या जलमार्गावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणला असल्याचा दावाही लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.
भारताला ग्रीन सिग्नल; ऊर्जा संकट टळणार?
आधी केवळ चीनसाठी हा मार्ग खुला असल्याचे वृत्त होते, मात्र आता इराणने भारतालाही या कडक निर्बंधातून बाहेर ठेवले आहे. भारतासाठी हे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे. होर्मुजमधून जगाच्या एकूण तेल पुरवठ्याचा २० टक्के इंधन वाहून नेले जाते. या नाकाबंदीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना, भारताला इथून तेल पुरवठा सुरू राहणार असल्याने देशांतर्गत इंधन दरांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण नाकाबंदी
१९८०-८८ च्या इराण-इराक युद्धाच्या काळातही या जलमार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली नव्हती. मात्र, शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर, इराणने हा मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सध्या दुबई आणि कुवैतच्या किनाऱ्याजवळ शेकडो तेलवाहू जहाजे आणि टँकर्स अडकून पडल्याचे सॅटेलाईट डेटावरून स्पष्ट दिसत आहे.
जगावर सावट, भारताची स्थिती भक्कम
होर्मुज जलमार्ग हा पर्शियन गल्फमधील देशांसाठी बाहेर पडण्याचा एकमेव रस्ता आहे. जगातील १० वे मोठे कंटेनर टर्मिनल असलेले दुबईचे जेबेल अली बंदर याच मार्गावर अवलंबून आहे. या नाकाबंदीमुळे आशिया आणि युरोपमधील व्यापारावर प्रचंड ताण येणार आहे. अशा परिस्थितीत इराणने भारताला दिलेली सवलत ही दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ असल्याचे दिसत आहेत.
Web Summary : Amidst rising tensions, Iran has opened the Hormuz Strait for India and China, while blocking access for the US, Israel, and Europe. This move allows crucial oil supplies to continue to India, potentially stabilizing domestic fuel prices despite global market disruptions.
Web Summary : बढ़ते तनाव के बीच, ईरान ने भारत और चीन के लिए होर्मुज जलडमरूमध्य खोल दिया है, जबकि अमेरिका, इजराइल और यूरोप के लिए पहुंच को अवरुद्ध कर दिया है। इस कदम से भारत को महत्वपूर्ण तेल आपूर्ति जारी रखने की अनुमति मिलती है, जिससे वैश्विक बाजार व्यवधानों के बावजूद घरेलू ईंधन की कीमतें स्थिर हो सकती हैं।