शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

सोनेरी हिरा विकला जाणार दीड कोटी डॉलर्सना!, डिसेंबरमध्ये लिलाव, एक डॉलरपासून लागणार बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 06:51 IST

१९८० च्या दशकाच्या प्रारंभी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोत एक मुलगी काकांच्या घरामागे खेळत असताना एका ढिगाऱ्यात तिला हा हिरा सापडला होता.

न्यूयॉर्क : जगातील सर्वात मोठ्या रंगीत हिऱ्यांपैकी एक असलेल्या ‘गोल्डन कॅनरी’ या हिऱ्याचा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात डिसेंबरमध्ये लिलाव होईल. ३०३.१० कॅरेटच्या या पिवळ्या हिऱ्याची राखीव किंमत ठरलेली नाही. त्यामुळे त्यासाठीची बोली अवघ्या एक डॉलरपासून सुरू होईल. हा हिरा दीड कोटी अमेरिकी डॉलरला विकला जाईल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेतील लिलाव कंपनी सोथबीतर्फे हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.  (वृत्तसंस्था)

भंगार म्हणून दिला होता फेकून १९८० च्या दशकाच्या प्रारंभी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोत एक मुलगी काकांच्या घरामागे खेळत असताना एका ढिगाऱ्यात तिला हा हिरा सापडला होता. नजीकच्या एमआयबीए या सरकारी हिरा खाणीतील कामगारांना हा हिरा सापडला होता. मात्र, तो अवजड असल्याने त्यांनी तो टाकून दिला होता. ज्याला ते भंगार म्हणत होते तो ८९० कॅरेटचा रफ कट (पैलू पाडण्यापूर्वीचा खडबडीत) हिरा असेल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. तो जगातील सर्वात मोठ्या रफ हिऱ्यांपैकी एक होता. मुलीने हा दगड तिच्या काकांना दिला, त्यांनी तो स्थानिक हिरे व्यापाऱ्याला विकला. 

कसे मिळाले नाव? हिरा पहिल्यांदा १९८४ मध्ये स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे प्रदर्शित केला. नंतर कापून त्याचे छोटेमोठे १५ हिरे तयार करण्यात आले. सर्वात मोठा ४०७.४९ कॅरेटचा फॅन्सी खोल तपकिरी-पिवळा हिरा ‘अतुलनीय’ म्हणून ओळखला जात असे. शेवटी रंगाची खोली वाढवण्यासह रुपडे आकर्षक करण्यासाठी ‘अतुलनीय’वर पुन्हा प्रक्रिया करण्यात आली. यानंतर, तयार झालेल्या हिऱ्याला गोल्डन कॅनरी असे नाव देण्यात आले. 

- गडद पिवळ्या रंगाचा व नाशपतीसारखा आकाराच्या हिऱ्याचा जगातील सर्वांत मोठ्या पॉलिश्ड हिऱ्यांमध्ये समावेश होतो. जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेने मानांकन दिलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अंतर्गतरीत्या निर्दोष हिरा आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाGoldसोनं