गो:या पोलिसाला निदरेष मानल्याने अमेरिकेत उसळला हिंसाचार
By Admin | Updated: November 26, 2014 02:45 IST2014-11-26T02:45:54+5:302014-11-26T02:45:54+5:30
गौरवर्णीय पोलीस अधिका:याला सेंट लुईस कौंटीतील ग्रँड ज्युरीने निदरेष सोडून दिल्यामुळे अमेरिकेतील मिसुरी राज्यात हिंसाचार उफाळला आहे.

गो:या पोलिसाला निदरेष मानल्याने अमेरिकेत उसळला हिंसाचार
फर्गसन शहरातील प्रकार : महिनाभरापूर्वी झाली होती कृष्णवर्णीय किशोराची हत्या; ग्रँड ज्युरीच्या निकालानंतर हिंसक उद्रेक
क्लेटन : मायकेल ब्राऊन या कृष्णवर्णीय विद्याथ्र्यावर नि: शस्त्र असताना गोळ्या झाडून त्याला ठार मारणा:या डॅरेन विल्सन या गौरवर्णीय पोलीस अधिका:याला सेंट लुईस कौंटीतील ग्रँड ज्युरीने निदरेष सोडून दिल्यामुळे अमेरिकेतील मिसुरी राज्यात हिंसाचार उफाळला आहे. तीन महिन्यापूर्वी घडलेल्या या हत्येनंतर समाजात आजही प्रक्षोभ आहे.
सेंट लुईसचे सरकारी वकील रॉबर्ट मॅक्युलो यांनी सोमवारी रात्री उशिरा निकाल जाहीर केला. त्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी पोलीस कार तसेच इमारती पेटवून दिल्या , शहरातील दुकानावर दगडफेक व लुटालूट झाली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूराची नळकांडी फोडली. निकाल देणा:या ज्युरीमध्ये नऊ गौरवर्णीय व तीन कृष्णवर्णीय लोक होते. सोमवारी रात्री हा निकाल जाहीर करताच हिंसाचाराची नवी लाट उसळली आहे. फर्गसन शहरातील रस्त्यावर ऑगस्ट महिन्यात डॅरेन विल्सन या पोलीस अधिका:याने नि : शस्त्र कृष्णवर्णीय युवक मायकेल ब्राऊन याला ठार मारले होते. हे पोलिसांचे क्रौर्य असा ठप्पा समाजाने ठेवला होता. या पोलीस अधिका:यावर गुन्हा दाखल होणार नाही हे समजल्यानंतर समाजात क्रोध उसळला.
शेकडो लोक फर्गसनच्या पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यातले बहुतांश लोक रडत होते. मारेकरी पोलिसाला हाकला अशा घोषणा जमाव देत होता. काही लोकांनी बाटल्या व दगडफेक केली. ही निदर्शने शांततेच्या मार्गाने करावीत अशी विनंती ब्राऊन कुटुंबाने केली आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी लोकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. आमच्या दु:खात अनेक लोक सहभागी आहेत हे आम्हाला समजले आहे. तुमची निराशा, तुमचा क्रोध समाजात चांगला बदल घडवून आणण्यासाठी वापरा , असे ब्राऊन कुटुंबियाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. असा प्रकार घडू देणारी व्यवस्था बदलली पाहिजे. रस्त्यावर काम करणा:या प्रत्येक पोलिसाच्या शरीरावर कॅमेरा असला पाहिजे, असेही या निवेदनात म्हटले आहे. ग्रँड ज्युरीत या निकालाबाबात दोन दिवस चर्चा सुरु होती. साक्षीदारांच्या साक्षी, पुरावे यांची छाननी करुन प्रत्यक्ष घटनेचे चित्र उभे करण्यात आले, त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
न्यूयॉर्क व लॉस एंजिल्स येथेही मोर्चे
ज्युरीच्या या निकालाच्या निषेधार्थ न्यूयॉर्क व लॉस एंजिल्स येथेही मोर्चे काढण्यात आले. हजारो लोक सहभागी असणारे हे मोर्चे शांततेत निघाले. (वृत्तसंस्था)
राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे शांततेचे आवाहन
4अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी लोकांना शांत राहावे व हिंसाचार करु नये, असे आवाहन केले आहे. मायकेल ब्राऊनच्या पालकांनी हा निकाल शांततेने व संयमाने स्वीकारण्याचे आवाहन केले आहे, मी त्यांच्या बरोबर आहे, असे ओबामा म्हणाले. रात्री उशिरा व्हाईट हाऊसच्या प्रसार कक्षात येऊन त्यांनी हे आवाहन केले आहे.
4फर्गसनच्या पोलीस अधिका:यांनीही संयम बाळगावा व निदर्शने शांततेत होतील असे पाहावे, असे ओबामा यांनी म्हटले आहे. हिंसाचार पसरल्याने नॅशनल गार्डसचे सैनिक बोलावले असून मिसुरीचे गव्हर्नर जे निक्सन यांनी शांततेचे आवाहन केले आहे. फग्यरुसन येथील शाळा आठवडाभर बंद ठेवण्यात आल्या आहेत.