शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'भारतात निघून जा...' आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर हल्ला; आई म्हणाली, 'ती मुलं हसत होती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:49 IST

आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवर तिथल्या अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Indian Origin Girl Attack in  Ireland: परदेशात भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आल्याची प्रकरणं समोर आली होती. त्यानंतर आता आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवरही हल्ला करण्यात आला. घराबाहेर खेळत असताना काही मुलांनी ६ वर्षांच्या मुलीला जबर मारहाण केली आणि भारतात निघून जा असं म्हणत धमकावलं. मारहाण करणारी मुलं ही अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान याआधी आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्येही भारतीय कॅबचालकावर विनाकारण हल्ला करण्यात आला.

आयर्लंडमध्ये अल्पवयीन मुलांच्या एका गटाने भारतीय वंशाच्या सहा वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आणि भारतात परत जा असं म्हणत धमकावलं.  वॉटरफोर्डमधील मुलीच्या घराबाहेर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोरांनी मुलीच्या गुप्तांगावर सायकलच्या चाकाने हल्ला केले. मुलीची आई आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे आणि नुकतीच ती आयर्लंडची नागरिक झाली आहे. मुलीवर १२ ते १४ वयोगटातील मुलांनी हल्ला केल्याचे तिच्या आईने सांगितले.

४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत होती. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलांचा गट तिथे आला ज्यामध्ये आठ वर्षांची मुलगी आणि १२ ते १४ वर्षे वयोगटातील अनेक मुले होती. आई तिच्या मुलीला इतर मुलांसोबत खेळताना पाहत होती. अचानक तिचा १० महिन्यांचा मुलगा रडू लागला आणि नंतर तिला त्याला खायला घालण्यासाठी घरात गेली. तितक्यात त्या मुलांनी मुलीवर हल्ला केला.

"मी मुलीला सांगितले की मी मुलाला दूध पाजून परत येत. पण मुलगी एक मिनिटानंतर अस्वस्थ होऊन घरी परतली. ती खूप अस्वस्थ होती, ती रडत होती. तिला बोलता येत नव्हते, ती खूप घाबरली होती. मुलीच्या मैत्रिणीने मला सांगितले की त्यापैकी पाच जणांनी तिच्या तोंडावर बुक्की मारली. एका मुलाने तिच्या गुप्तांगावर सायकलच्या चाकाने मारले, ज्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. त्यांनी एफ हा शब्द वापरला आणि घाणेरडे भारतीय, भारतात परत जा अस म्हटलं. तिच्या मानेवर बुक्की मारली आणि तिचे केस ओढले," असं मुलीच्या आईने सांगितले.

आम्हाला आता इथे सुरक्षित वाटत नाहीये, अगदी आमच्या घरातही नाही. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटते. मी तिचे रक्षण करू शकले नाही. असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. मला वाटले होते की ती इथे सुरक्षित असेल. मी नंतर त्या मुलांना पाहिले. ते माझ्याकडे पाहून हसत होते. ती मुले कदाचित १२ किंवा १४ वर्षांची असतील आणि घटनेनंतरही ती तिथेच फिरत होती, असंही पीडितेच्या आईने म्हटलं.

दरम्यान, मुलीवर हल्ला करणाऱ्या मुलांबद्दल आईने पोलिसांना माहिती दिली आहे. पण तिला त्यांना कोणतीही शिक्षा नको आहे. उलट तिने त्यांना समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन हवं आहे असं म्हटलं.

टॅग्स :Irelandआयर्लंडCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत