अर्जेंटिनात सापडला काजव्यासारखा चमकणारा बेडूक
By Admin | Updated: March 15, 2017 15:02 IST2017-03-15T14:57:51+5:302017-03-15T15:02:47+5:30
अर्जेटिनात काळोखात काजव्यासारखा चमकणारा पहिला बेडूक आढळून आला आहे.

अर्जेंटिनात सापडला काजव्यासारखा चमकणारा बेडूक
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 15 - अर्जेटिनात काळोखात काजव्यासारखा चमकणारा पहिला बेडूक आढळून आला आहे. या बेडकाची प्रजाती दक्षिणी अर्जेंटिनामध्ये सापडली आहे. या बेडकावर हिरवा, पिवळा व तांबडा रंग असून, तो काळोखात रंग बदलत असल्याचं समोर आलं आहे. तसेच हा बेडूक अंधारात निळा किंवा हिरवा प्रकाश बाहेर टाकतो, असं संशोधकांनी शोधून काढलं आहे. कमी तरंगलहरीचा प्रकाश शोषून घेऊन जास्त तरंगलहरींचा प्रकाश बाहेर फेकण्याचा गुणधर्म या बेडकामध्ये आहे. आतापर्यंत उभयचर प्राण्यांमध्ये असा गुणधर्म आढळून आला नव्हता.
संशोधकांनी साऊथ अमेरिकन पोल्का डॉट ट्री या जातीचा बेडूक शोधला आहे. हा बेडूक लहरींचा वापर करत असतो, पण लहरी इतर प्राण्यांच्या लहरींपेक्षा वेगळे असतात. महासागरातील अनेक प्राण्यांकडे अशा प्रकारच्या लहरी असतात; त्यात प्रवाळ, मासे, शार्क व हॉकबील कासव (एरेटोमोचेलीस इंब्रिकाटा) यांचा समावेश आहे. प्राण्यांमध्ये हा गुणधर्म कोठून येतो, याचा अद्यापही शोध लागलेला नाही. संदेश पाठवणे, रंग बदलून स्वसंरक्षण करणे, जोडीदाराला आकर्षित करणे हे त्याचे हेतू असू शकतात. या प्रजातीच्या बेडकामध्ये लाल रंगाचा प्रकाश दिसू शकतो.
पोलका डॉट फ्री हा बेडूक वेगळा असून तो निळा-हिरवा प्रकाश बाहेर टाकतो. अर्जेंटिना येथे पोलका डॉट ट्री बेडूक सापडले असून, ते हिरवा व निळा प्रकाश बाहेर टाकतात. हायलॉइन एल 1 , हायलॉइन एल 2, हायलॉइन जी 1 रेणू त्यांच्या लसिका पेशी, त्वचा व इतर ठिकाणी असतात, त्यामुळे ते हिरवा प्रकाश बाहेर टाकतात. त्यांच्यात अगदी वेगळ्या प्रकारची हायड्रोकार्बन श्रृंखला असतात आणि ती इतर कुठल्याही प्राण्यात आढळून येत नाही. चंद्राप्रमाणे 18 टक्के दृश्य प्रकाश लहरी हा बेडूक बाहेर टाकतो. या बेडकांच्या प्रजातीला त्यांचा स्वत:चा प्रकाश दिसतो की नाही याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे, असं संशोधन जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकडमी ऑफ सायन्सेस केलं आहे.