शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला रोखठोक प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत; लागू होणार EFTA!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:12 IST

अमेरिकेच्या टॅरिफ समस्येचा सामना करण्यासाठी भारत आणि हे चारही युरोपीयन देश एकत्रितपणे मार्ग काढण्याच्या तयारीत आहे...

भारतानेडोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अ‍ॅटॅकला रोखठोक प्रत्युत्तर देण्याची तयारीत केली आहे. ग्लोबल टॅरिफ वॉरचा सामना करण्यासाठी भारताने चार युरोपीयन देशांसोबत फ्री ट्रेड सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे. यामुळे या देशांसोबत कुठल्याही अडथळ्याशिवाय भारताचा व्यापार चालू शकेल.

अमेरिकेच्या टॅरिफ समस्येचा सामना करण्यासाठी भारत आणि हे चारही युरोपीयन देश एकत्रितपणे मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी भारत वाणिज्य मंत्रालयांतर्गत EFTA डेस्क स्थापन करेल. EFTA म्हणजे, युरोपियन फेडरेशन ट्रेड अ‍ॅग्रीमेंट. यासाठी गेल्या वर्षी १० मार्च रोजीच EFTA सोबत करार करण्यात आला होता. सोमवारी भारत सरकारने यासंदर्भात माहिती दिली.

EFTA मध्ये या चार देशांचा समावेश - EFTA म्हणजे युरोपियन युनियन बाहेरील चार देशांचा समूह आहे. यात स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टाईन देशांचा समावेश आहे. या कराराला TEPA अर्थात व्यापार तथा आर्थिक भागीदारी करार असे नाव देण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा करार लागू होणे अपेक्षित आहे. वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते, भारत मंडपम येथे ईएफटीए ब्लॉकच्या प्रतिनिधींसह ईएफटीए डेस्कचे उद्घाटन करण्यात येईल.

स्वित्झर्लंडचे परराष्ट्रमंत्री हेलेन बुडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग मंत्री टॉमस नॉर्वोल, आइसलँडचे परराष्ट्र मंत्री मार्टिन आयजॉल्फसन आणि लिकटेंस्टाईनचे परराष्ट्र मंत्री डोमिनिक हॅस्लर हे देखील यावेळी उपस्थित राहतील.

ग्लोबल ट्रेड वॉर दरम्यान का आवश्यक आहे EFTA? -डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अ‍ॅटॅकनंतर, ग्लोबल लीडर चिंतित असतानाच, भारताने ईएफटीए डेस्कची केलेली स्थापना अत्यंत महत्वाची आहे. या समूहाकडून भारताला गेल्या 15 वर्षांत 100 अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले आहेत. याशिवाय, भारत २७ देशांचा समूह असलेल्या युरोपियन युनियनसोबत एक व्यापक मुक्त व्यापार करार करण्यासाठी स्वतंत्रपणे वाटाघाटी करत आहे.

टॅग्स :IndiaभारतSwitzerlandस्वित्झर्लंडAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी