शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

"कमीत कमी 8 मुलं जन्माला घाला अन्...", राष्ट्रपती पुतिन यांनी महिलांना का केलं असं आवाहन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:28 IST

लांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना पुन्हा एकदा आदर्श मानण्याचे आवाहन केले आहे.

रशियाचे राष्ट्रप्ती व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या देशातील महिलांना एक विचित्र आवाहन केले आहे. वर्ल्ड रशियन पीपल्स काउंन्सिलमध्ये बोलताना पुतिन यांनी महिलांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना पुन्हा एकदा आदर्श मानण्याचे आवाहन केले आहे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, पुतीन यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या या विधानामागचे एक कारण म्हणजे, 1990 च्या दशकापासून रशियाचा सातत्याने घसरत असलेला जन्मदर. यात कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून देशात जवळपास तीन लाखांहून अधिक लोक मारले गेले आहेत.

'ही वेळ आपली आहे' -रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात रशियातील अनेक पारंपरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी पुतीन म्हणाले, पुढील अनेक वर्षांसाठी रशियाची लोकसंख्या वाढविणे हे सरकार समोरील महत्वाचे लक्ष असणार आहे. जेणे करून आगामी काळात देशाची लोकसंख्या अपेक्षे प्रमाणे वाढू शकेल. यामुळे रशियाचे भविष्य सुरक्षित होईल. येणारा काळ रशियाचा आहे. तसाच पूर्वीसारखा बलशाली आणि शाश्वत रशिया.

पुतीन म्हणाले, 'रशियातील काही जाती समूहांनी आजही चार, पाच अथवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याची परंपरा जपली आहे. आपल्याला हे लक्षात असायला हवे की, पूर्वी रशियन कुटुंबात आपल्या आजी-पंणजीला सात, आठ अथवा त्याहूनही अधिक मुलं हेत होती. चला, या उत्कृष्ट परंपरांचे जतन आणि पुनरुज्जीवन करूया. मोठी कुटुंबे आदर्श व्हायरला हवीत, कारण कुटुंब हा केवळ राज्याचा आणि समाजाचा पाया नसून, ती एक आध्यात्मिक घटना आणि नैतिकतेचा स्रोत आहे.'

3 लाख जणांचा मृत्यू 9 लाख लोकांनी देश सोडला? -पुतिन यांच्या याच्या वक्तव्याचे पाश्चिमात्य देशांतील विश्लेशकांनी विश्लेशन करायलाही सुरुवात केली आहे. खरे तर, पुतीनयांच्या वक्तव्यात युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांच्या आकडेवारीचा उल्लेख नाही. मात्र, अनेक तज्ज्ञांनी पुतीन यांचे हे वक्तव्य युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या अशा आकडेवारीसोबत जोडले जात आहे, ज्यासंदर्भात आतापर्यंत मास्को प्रशासन कुठल्याही प्रकारची पुष्टी केलेली नाही. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाWomenमहिला