१००० लाइक्स द्या अन्यथा मुलाला फेकेन..!

By Admin | Updated: June 23, 2017 00:10 IST2017-06-23T00:10:31+5:302017-06-23T00:10:31+5:30

सोशल मीडियावर या छायाचित्राने खळबळ माजवली आहे. लोक या छायाचित्राला केवळ फेसबुक आणि टिष्ट्वटरवर शेअरच करीत नसून निर्दयी बापाला शिव्यांची लाखोलीही वाहत आहेत

Give 1000 Likes Or Falcon Child ..! | १००० लाइक्स द्या अन्यथा मुलाला फेकेन..!

१००० लाइक्स द्या अन्यथा मुलाला फेकेन..!

अल्जीयर्स : सोशल मीडियावर या छायाचित्राने खळबळ माजवली आहे. लोक या छायाचित्राला केवळ फेसबुक आणि टिष्ट्वटरवर शेअरच करीत नसून निर्दयी बापाला शिव्यांची लाखोलीही वाहत आहेत. हे छायाचित्र अल्जीरियाची राजधानी अल्जीयर्स येथे घेतलेले आहे. एका माथेफिरू बापाने १५ व्या मजल्यावरून आपल्या मुलाला लटकवून त्याचा फोटो काढला. त्यामागील कारण ऐकून हसावे की रडावे हेच कळत नाही. फेसबुकवर हीरो बनण्यासाठी माथेफिरू बापाने चिमुकल्याचा जीव धोक्यात घातला. त्याने एका हाताने मुलाचा टी-शर्ट पकडून त्याला खिडकीतून लटकवले आणि दुसऱ्या हाताने फोटो काढून फेसबुकवर अपलोड केला आणि त्या फोटोखाली त्याने लिहिले, ‘जर मला १००० लाइक्स नाही मिळाले तर मी मुलाला खाली फेकेन’. या फोटोवरून खळबळ माजून प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने दोषी पित्याला दोन वर्षांचा कारावास ठोठावला. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी थायलंडमध्ये एका पित्याने आपल्या ११ महिन्यांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारली. एवढेच नाहीतर त्याने आपल्या आत्महत्येचे लाइव्ह स्ट्रीमिंगही केले. ते पाहून त्याची पत्नीच नाहीतर जग सुन्न झाले होते. अशाच प्रकारे एका पतीने पत्नीचे लक्ष वेधण्यासाठी पाच वर्षांच्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने या कृत्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग करून पत्नीला घाबरविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी बचावली.

Web Title: Give 1000 Likes Or Falcon Child ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.