शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या डोक्यातून आरपार गेलेल्या गोळीने मैत्रिणीचा मृत्यू !

By admin | Updated: May 25, 2017 19:15 IST

एका प्रेमी युगुलातील तरुणाने आत्महत्या करण्यासाठी स्वत:वर झाडून घेतलेली गोळी त्याच्या कवटीतून आरपार जाऊनही तो वाचला

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 25 - एका प्रेमी युगुलातील तरुणाने आत्महत्या करण्यासाठी स्वत:वर झाडून घेतलेली गोळी त्याच्या कवटीतून आरपार जाऊनही तो वाचला. पण त्याच्या डोक्यातून बाहेर पडलेली गोळी शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या मैत्रिणीला लागून तिचा मृत्यू झाल्याची विचित्र आणि करुण घटना अमेरिकेत घडली आहे.अलास्का राज्यातील अँकरेज शहरात काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना त्यासंबंधीचा खटला न्यायालयात आल्यावर उघड झाली. आत्महत्येतून वाचलेल्या या तरुणाला गेल्या रविवारी न्यायालयात उभे केले गेले आणि ग्रॅण्ड ज्युरीने त्याला सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरविले. त्यास न्यायालय नंतर शिक्षा ठोठावेल. या दुर्दैवी घटनेतील २२ वर्षांच्या तरुणाचे नाव व्हिक्टर सिबसन असे असून त्याच्याकडून जिचा चुकून मृत्यू झाला ती ब्रिटनी-मे हॅग ही त्याची मैत्रीण २२ वर्षांची होती. ही घटना घडल्यानंतर सिबसन स्वत:हून अँकरेज पोलिसांपुढे हजर झाला व त्यानंतर त्याच्यावर हा खटला उभा राहिला.प्रॉसिक्युटरने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार गेल्या महिन्यात ही घटना घडली त्या दिवशी अँकरेज शहराच्या मिडटाऊन भागातील एका हौसिंग कॉम्प्लेक्समधील क्लबमधून पोलिसांना ‘९११’ या नंबरवर इमर्जंसी कॉल आला. पोलीस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना व्हिक्टर आणि ब्रिटनी बुंदुकीच्या गोळीने गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत दिसले. दोघांनाही इस्पितळात हलविण्यात आले. पण त्या दिवशी नंतर ब्रिटनीचा मृत्यू झाला. व्हिक्टर आणि ब्रिटनी या दोघांच्याही शरीरांत एकच गोळी घुसल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याचे न्यायालयास सांगताना सहाय्यक जिल्हा प्रॉसिक्युटर जेम्स फायेट यांनी नमूद केले की, व्हिक्टरच्या डोक्याच्या डाव्या बाजूस गोळी आत शिरल्याची तर कवटीच्या वरच्या भागात गोळी बाहेर पडल्याची जखम उत्तरीय तपासणीत आढळून आली. व्हिक्टरच्या डोक्यातून आरपार बाहेर पडलेली गोळी ब्रिटनीच्या महत्वाच्या अवयवांत घुसून तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष फॉरेन्सिक तज्ज्ञांनी काढला असल्याचेही प्रॉसिक्युटर फायेट यांनी न्यायालयास सांगितले.