जीभेचा इन्शुरन्स साडे नऊ कोटी रुपये
By Admin | Updated: November 27, 2014 18:05 IST2014-11-27T17:46:00+5:302014-11-27T18:05:46+5:30
सबेस्टियन माइकलीस या व्यक्तीच्या जीभेचा इन्शुरन्स ९ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये इतका आहे.

जीभेचा इन्शुरन्स साडे नऊ कोटी रुपये
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २६ - खेळाडू आणि सीनेकलाकार वगळता इतर कुणीही आपल्या अवयवांचा विमा काढण्याचा फारसा विचार करत नाही. परंतू, सबेस्टियन माइकलीस या व्यक्तीच्या जीभेचा इन्शुरन्स ९ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये इतका आहे. व्यवसायाने टी टेस्टर असलेल्या या व्यक्तीच्या जिभेचा विमा टेटली या कंपनीने काढला असून कंपनीतील चहाची चव ओळखणे हे त्याचे काम आहे. सबेस्टियन चहाची चव ओळखण्यात पारंगत असल्याने त्याच्या जिभेवर कंपनीने इतकी रक्कम खर्च केली आहे. फक्त १५ सेकंदात तो चहाची चव घेऊन चहातील त्रुटी ओळखू शकतो. एका आठवड्यात अंदाजे ४० हजार प्रकारच्या चहांचे परिक्षण सबेस्टियन कडून केले जाते. विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना सबेस्टियनने टेटेले कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी स्विकारली आणि पुढे त्याने स्वतःला चहाची चव ओळखण्यासाठी झोकून दिले.
सबेस्टियन प्रमाणे इतरही अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या अवयवांचा महागडा विमा काढला आहे. ज्यामध्ये टॉम जोंसने आपल्या छातीवरच्या केसांचा विमा ३.५ मिलियन पाऊंड केला आहे. हॉलीवुडचा कलाकार अमेरिका फरेराने आपल्या हास्याचा विमा ६.४ मिलियन इतक्या रकमेचा काढला आहे. मारिया कॅरीने आपल्या पायांचा विमा ६३६ मिलियन पाऊंड इतक्या रकमेचा आहे. या यादीमध्ये डेव्हिड बॅकहॅम, रिहाना, मॅडोना, डॅनियल क्रेग यांचाही समावेश आहे.