पायलटचे प्रवाशांना गिफ्ट

By Admin | Updated: May 15, 2017 00:07 IST2017-05-15T00:07:28+5:302017-05-15T00:07:28+5:30

साऊथवेस्ट एअरलाइन्सचे पायलट कॅ. जॉन चार्ल्स रिची यांच्यासाठी तो दिवस अतिशय आनंददायी होता. त्यांनी सेवेची २२ वर्षे पूर्ण केली आणि दहा लाख प्रवाशांना सुरक्षित

Gift to Pilot Passengers | पायलटचे प्रवाशांना गिफ्ट

पायलटचे प्रवाशांना गिफ्ट

न्यूयॉर्क : साऊथवेस्ट एअरलाइन्सचे पायलट कॅ. जॉन चार्ल्स रिची यांच्यासाठी तो दिवस अतिशय आनंददायी होता. त्यांनी सेवेची २२ वर्षे पूर्ण केली आणि दहा लाख प्रवाशांना सुरक्षित आपल्या नियोजित स्थळी पोहोचविले. याचेच निमित्त साधून जॉन यांनी विमानातील प्रवाशांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या विमानातून आपण दहा लाखाव्या प्रवाशाला घेऊन उड्डाण करीत आहोत. हे ऐकून प्रवाशांनाही अतिशय आनंद झाला. थोड्याच वेळात त्यांनी लकी प्रवाशाचे नाव जाहीर केले. ती एक महिला होती. जॉन यांनी तिला शँपेनची एक बाटली आणि अन्य वस्तू भेट दिल्या. तिकिटाचे पैसेही त्यांनी दिले. यानंतर जॉन यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे

Web Title: Gift to Pilot Passengers